For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हास्यजत्रेच्या सृजन टीमला मोठा धक्का; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन

12:27 PM Sep 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
हास्यजत्रेच्या सृजन टीमला मोठा धक्का  लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन
Advertisement

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांचे रात्री अपघातात निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने कलाक्षेत्रासह हास्यजत्रा टीम, मित्रपरिवार आणि चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

विजय कुमार राख हे विनोदाची उत्तम जाण असलेले आणि ग्रामीण जीवनातील बारकावे आपल्या लेखनातून प्रभावीपणे मांडणारे मराठवाड्यातील होतकरू लेखक होते. आपल्या लेखनशैलीतून त्यांनी ग्रामीण जीवनातील प्रसंग, माणसांचे स्वभाव आणि दैनंदिन जीवनातील विनोदी पैलू प्रभावीपणे टिपले.

ऐन तारुण्यात झालेल्या त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच त्यांच्या निधनामुळे ‘हास्यजत्रा’च्या सृजन टीमचेही मोठे नुकसान झाले आहे.

Advertisement

विजय कुमार राख यांच्या निधनाबद्दल कलाक्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत असून, ‘हास्यजत्रा’ टीमने त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि मित्रपरिवाराने त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Advertisement
Tags :

.