भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत विजयगुजराती
ब्लॉकबस्टर ‘लालो’च्या तेलगू रिमेकची तयारी
गुजराती चित्रपटसृष्टीच्या इतिहासात विक्रम नोंदविणारा चित्रपट ‘लालो-कृष्ण सदा सहायते’चा आता तेलगू रिमेक येणार आहे. या रिमेकमध्ये विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत असणार आहे. विजय या चित्रपटात बासरी वादन करताना दिसून येणार आहे. यात विजय हा भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारणार आहे.
प्रथम या प्रोजेक्टसाठी मेगास्टार राम चरणसोबत बोलणी सुरू होती. परंतु आता या भूमिकेसाठी विजयचे नाव अंतिम करण्यात आले आहे. विजय याच्यासाठी हा दुसरा मोठा पौराणिक-भक्ती अवतार असणार आहे. या तेलगू रिमेकचे दिग्दर्शन कार्तिक सुब्बाराज करणार आहे. कार्तिकला ‘जिगरथंडा’, ‘पेट्टा’ आणि ‘महान’ यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखले जाते.
कार्तिकची अनोखी कहाणी मांडण्याची शैली या अध्यात्मिक आणि भावनात्मक ड्रामाला एक नवा रंग देऊ शकते. सध्या हा प्रोजेक्ट प्रारंभिक चर्चेच्या टप्प्यात आहे. निर्माते तेलगू प्रेक्षकांचा कल विचारात घेत याची पटकथा आणि कलाकारांच्या नावांना अंतिम रुप देत आहेत.
गुजराती चित्रपट ‘लालो-कृष्ण सदा सहायते’ची निर्मिती केवळ 50 लाख रुपयांमध्ये झाली होती आणि या चित्रपटाने 120 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा बॉक्स ऑफिसवर ओलांडला होता. 100 कोटीच्या क्लबमध्ये सामील होणारा हा पहिला गुजराती चित्रपट ठरला होता.