नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने दक्षता जागरुकता सप्ताह
12:31 PM Oct 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने हुबळी येथील रेलसौध येथे दक्षता जागरुकता सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आरडीएसओचे निवृत्त संचालक व्ही. रामचंद्रन उपस्थित होते. निविदा हाताळताना पाळल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या बाबींविषयी त्यांनी माहिती दिली. प्रत्येक निविदा पारदर्शक होण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्याचबरोबर लेखा परीक्षणाविषयी त्यांनी माहिती दिली. दुपारच्या सत्रात सायबर सुरक्षा याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वेच्या यंत्रणा हाताळताना सायबर सुरक्षा किती महत्त्वाची आहे, यासंबंधी माहिती देण्यात आली. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अण्णादुराई यांच्यासह हुबळी, म्हैसूर व बेंगळूर येथील रेल्वे व्यवस्थापक ऑनलाईन सहभागी झाले होते.
Advertisement
Advertisement