For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेकिनकेरे डोंगर पायथ्याशी सांबराचे दर्शन

10:50 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेकिनकेरे डोंगर पायथ्याशी सांबराचे दर्शन
Advertisement

पळत जातानाचा व्हिडिओ व्हायरल, नागरिकांमध्ये कुतुहल

Advertisement

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाहद्दीवरील बेकिनकेरे डोंगर पायथ्याशी गुरुवारी हरीण प्रजातीतील सांबराचे दर्शन झाले. डोंगर पायथ्याशी सांबर पळत जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे नागरिकांतही याचे कुतुहल वाटू लागले आहे. भरदिवसा शेतवडीजवळ सांबर आल्याची घटना घडली आहे. कुत्र्याची चाहूल लागताच या सांबराने डोंगराकडे धाव घेतली. याबाबत वनखात्याने वन्यप्राण्यांना कोणताही त्रास देऊ नये, असे आवाहन केले आहे. अलीकडे वन्यप्राण्यांचा वावर वाढू लागला आहे. विशेषत: मानवी वस्तीत वन्यप्राणी येण्याच्या घटना वाढल्या आहेत. सहा महिन्यांपूर्वी भरदिवसा हत्तीने गावातून फेरफटका मारला होता. पुन्हा सांबर दिसल्याने नागरिकांमध्ये कुतुहल निर्माण झाले. वाट चुकल्याने ते शिवारानजीक आले होते. कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे ते डोंगराच्या दिशेने पळाले. सीमाहद्दीत असलेल्या डोंगर क्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. हरीण, सांबर, गवीरेडे, रानडुक्कर, हत्ती, साळींद्र यांचा उपद्रव कायम आहे. त्यामुळे डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात यांचे दर्शन होऊ लागले आहे. वन्यप्राणी नजरेस पडताच वनविभागाला कळवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.