For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डीजे-लाऊडस्पीकरविरोधी भूमिका मांडताना विद्यानंद बापटांवर हल्ला; संशयित पोलिसांच्या ताब्यात

04:12 PM Sep 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
डीजे लाऊडस्पीकरविरोधी भूमिका मांडताना विद्यानंद बापटांवर हल्ला  संशयित पोलिसांच्या ताब्यात
Advertisement

पुणे : सार्वजनिक ठिकाणी डीजे किंवा लाऊडस्पीकरचा वापर करू नये, अशी भूमिका सातत्याने मांडणारे विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी सकाळी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना काही हल्लेखोरांनी बापट यांना मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, कथित हल्लेखोराचा एक जुना व्हिडीओही समोर आला आहे.

Advertisement

गणेशोत्सवाच्या काळात डीजे, लाऊडस्पीकर आणि ढोलपथकाच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबाबत बापट यांनी यापूर्वीही भूमिका मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेला समाजातील काही घटकांकडून तसेच सोशल मीडियावर समर्थन मिळत असल्याचे सांगण्यात येते.

गुरुवारी सकाळी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना बापट पुन्हा याच मुद्द्यावर बोलत होते. त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे समोर आले. घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत.

Advertisement

दरम्यान, या प्रकरणातील कथित हल्लेखोराला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनेतील इतर व्यक्तींची भूमिका याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

या घटनेनंतर गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, हल्ल्याच्या घटनेचा पुणे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.