For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

विद्याभारती जिल्हास्तरीय बैठक उत्साहात

10:13 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
विद्याभारती जिल्हास्तरीय बैठक उत्साहात

बेळगाव : अनगोळ येथील बेळगांव जिल्हा विद्याभारती वार्षिक योजना बैठक उत्साहात पार पडली. सदर बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या विद्याभारतीच्या विविध शैक्षणिक उपक्रम जाहीर करण्यात आले. संत मीरा शाळेच्या सभागृहात झालेल्या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दप्तरदार, प्रांतसंघटना कार्यदर्शी उमेशकुमार, रामकृष्ण जी, विद्याभारती बेळगाव जिल्हा अध्यक्ष माधव पुणेकर, उपाध्यक्ष रामनाथ नाईक, सचिव सुभाष कुलकर्णी. उपस्थित होते. प्रारंभी सुजाता दप्तरदार यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला तर राघवेंद्र कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Advertisement

यानंतर मागील वर्षी विद्याभारतीच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रम, क्रीडास्पर्धा, विज्ञान मेळावा ,विविध विषयाचे कार्यशाळेची आढावा घेण्यात आली, यानंतर पुढिल शैक्षणिक  वर्षात होणाऱ्या विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेलन संत मीरा अनगोळ, विज्ञान मेळावा संत मीरा गणेशपुर, क्रीडास्पर्धा देवेंद्र जीनगौडा स्कूल शिंदोळी, तर विविध विषयांची कार्यशाळा शांतीनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर या ठिकाणी घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, तसेच राज्य, क्षेत्रीय, व राष्ट्रीय विज्ञान मेळावा व क्रीडा स्पर्धांच्या तारखेबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला विद्याभारती संलग्नित जिह्यातील संत मीरा अनगोळचे ऋतुजा जाधव, गीता वरपे, आशा कुलकर्णी, सी.आर. पाटील, प्रेमा मेलिंनमनी, सविता पाटणकर, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूरच्या मुख्याध्यापिका श्रद्धा पाटील, संत मीरा स्कूल गणेशपुरच्या मुख्याध्यापिका आरती पाटील, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरच्या मुख्याध्यापिका स्वाती वाळवे, ओमकार गावडा, देवेंद्र जिनगौडा स्कूल शिंदोळीच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी पाटील, ज्ञान प्रबोधिनी स्कूलचे एस व्ही गोरखिंडी,व  सी व्ही रामन स्कूलच्या मुख्याध्यापिका एस व्ही नागागौडर रामदूर्ग शालेय शिक्षकवर्ग उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.