अक्षयसोबत झळकणार विद्या बालन
विद्या बालनने दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यापासून अंतर राखले आहे. विद्या यापूर्वी ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटात दिसून आली होती, त्यानंतर अभिनेत्रीचे चाहते तिच्या वापसीची प्रतीक्षा करत आहेत. आता विद्या बालनला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. अनीस बाज्मींच्या आगामी चित्रपटात ती काम करणार आहे. या चित्रपटात विद्या बालनसोबत अक्षय कुमार दिसून येणार आहे. अशाप्रकारे 2011 नंतर अनीस आणि अक्षय यांची जोडी 14 वर्षांनी एकत्र येणार आहे. दोघांनी यापूर्वी ‘थँक्यू’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.
विद्या बालनने बाज्मीच्या चित्रपटासाठी होकार दर्शविला आहे. अक्षय आणि विद्या यांची कलाकार म्हणून केमिस्ट्री अत्यंत चांगली आहे. त्यांनी यापूर्वी हे बेबी (2007), भूल भुलैया (2007) आणि मिशन मंगल यासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अनीस बाज्मीच्या आगामी चित्रपटात दोन अभिनेत्री असतील, यातील विद्या बालनचे नाव निश्चित झाले आहे.