For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘अखंडा 2-तांडवम’मध्ये विद्या बालन

06:03 AM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘अखंडा 2 तांडवम’मध्ये विद्या बालन
Advertisement

दाक्षिणात्य सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण यांचा चित्रपट

Advertisement

दाक्षिणात्य सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण आणि दिग्दर्शक बोयापति श्रीनु यांचा चित्रपट ‘अखंडा’च्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. आता या चित्रपटात एका बॉलिवूड अभिनेत्रीची एंट्री झाली आहे.

नंदमुरी बालकृष्ण सध्या ‘अखंडा 2- तांडवम’चे चित्रिकरण करत आहेत. बोयापति श्रीनु यांच्या दिग्दर्शनात हा चित्रपट तयार केला जात आहे. या चित्रपटात आता एका भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटात ती एका राजकारण्याची भूमिका साकारणार आहे. बालकृष्ण यांच्यासोबतचा तिचा हा दुसरा चित्रपट असेल. यापूर्वी तिने एनटीआर यांच्या बायोपिकमध्ये त्यांच्यासोबत काम केले आहे.

Advertisement

निर्मात्यांनी अखंडा 2 चित्रपटाचे पोस्टर जारी केले आहे. हा चित्रपट पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्रजीसोबत अनेक भाषांमध्ये पाहता येणार आहे. चित्रपटात प्रज्ञा जैसवाल मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. चित्रपटाची निर्मिती 14 रील्स प्लस बॅनर अंतर्गत राम अचंता आणि गोपीचंद अचंता यांनी केली आहे. चित्रपटाला थमन यांचे संगीत लाभले असून हा चित्रपट 25 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :

.