For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केंद्रीय मंत्र्याच्या पुत्राचा व्हिडिओ व्हायरल

05:41 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
केंद्रीय मंत्र्याच्या पुत्राचा व्हिडिओ व्हायरल
Advertisement

मध्यप्रदेशच्या राजकारणात खळबळ : भाजपने राजकीय कटाचा केला आरोप

Advertisement

मध्यप्रदेशच्या राजकारणात एका व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे पुत्र देवेंद्र प्रताप सिंह तोमर यांचा एक कथित व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कथित व्हिडिओवरून काँग्रेस देखील भाजपविरोधात आक्रमक झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचे माध्यम सल्लागार पीयूष बबेले यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

हा व्हिडिओ व्हायरल होत असून आता तरी चौकशी करा असे काँग्रेस नेते बबेले यांनी ईडी आणि सीबीआयला टॅग करत नमूद पेले आहे. या कथित व्हिडिओत केंद्रीय मंत्र्यांचे पुत्र देवेंद हे एका मायनिंग उद्योजकाकडून कोट्यावधी रुपये स्वीकारण्यासंबंधी संभाषण करत असल्याचे दिसून येते. परंतु या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी अद्याप झालेली नाही.

Advertisement

निवडणूक आचारसंहितेदरम्यान काळ्या पैशाबद्दल बोलले जातेय का याची चौकशी ईडी आणि सीबीआयने करावी असे बबेले यांनी म्हटले आहे. कथित व्हिडिओनंतर देवेंद्र तोमर यांच्या नावाने मुरैना पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आलेला एक अर्जही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ केवळ दुष्प्रचारासाठी असून त्यात एडिटिंग करून माझ्याविरोधात राजकीय कट  रचला जात असल्याचे देवेंद्र यांनी या पत्रात नमूद केले आहे. भाजपने हा व्हिडिओ खरा नसल्याचे म्हणत यामागे काँग्रेसचा हात असल्याचा दावा केला आहे. तर काँग्रेसने व्हिडिओवरून भाजपला लक्ष्य करण्याचे सत्र आरंभिले आहे.

Advertisement
Tags :

.