For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साई फार्म स्पोर्ट्स, जेवर गॅलरीची विजयी सलामी

09:57 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
साई फार्म स्पोर्ट्स  जेवर गॅलरीची विजयी सलामी
Advertisement

विश्रुत चिट्स चषक 13 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत

Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत विश्रुत चिट्स चषक 13 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात साई फार्म स्पोर्ट्स क्लबने एम सी सी सी रॉयल्स संघाचा व झेवर गॅलरी डायमंड संघाने टिळकवाडी कोचिंग अकॅडमी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली. सुरज सक्री, मोहम्मद हमजा याना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात साई स्पोर्ट्स क्लब संघाने एम सी सी सी रॉयल्स संघाचा आठ गड्यांनी पराभव केला.  रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 22 षटकात सर्व बाद 67 धावा केल्या. त्यात दृश रायकर 2 चौकारांसह 26, मोहम्मद अकिब कलादगीने 13 धावा केल्या. साई फार्म स्पोर्ट्स क्लब तर्फे सुरज सक्रीने 10 धावात 4, अद्वेwत चव्हाणने 2 गडी बाद केले, प्रत्युत्तरादाखल खेळताना साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने केवळ 7.5 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात 69 धावा करीत सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात अर्जुन येळ्ळूरकरने 28 चेंडूत 6 चौकारांसह 38 धावा तर साईराज पोरवालने 13 चेंडूत 5 चौकारांसह 22 धावा केल्या. रॉयल्स तर्फे दृश रायकर व वेदांत यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

दुसऱ्या थरारक लढतीत झेवर गॅलरी डायमंड संघाने टिळकवाडी कोचिंग अकॅडमी संघाचा केवळ 2 गड्यांनी पराभव केला. टिळकवाडी अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 6 गडी बाद 123 धावा केल्या. त्यात कौस्तुभ पाटीलने 4 चौकारांसह नाबाद 41, ओमकार कोरीहोणाने 3 चौकारांसह 23, सुजल गोरल व सिद्धार्थ यांनी प्रत्येकी 14 धावा केल्या. झेवर गॅलरी तर्फे अवनीश बसुर्तेकरने 2 गडी बाद केल.s प्रत्युत्तरादाखल खेळताना झेवर गॅलरी संघाने 24.3 षटकात आठ गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठले. कर्णधार मोहम्मद हमजाच्या शानदार नाबाद  अर्धशतकाच्या जोरावर हा सामना जिंकण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याने 71 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 55 धावा, आऊष पुत्रनने 3 चौकारांसह 22, वेदांत बिजलने 11 धावांचे योगदान दिले. टिळकवाडी अकादमीतर्फे स्वराज व सिद्धार्थ पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.  सामन्यानंतर प्रमुख पाहुणे मलिकजान मुल्ला, विवेक तिमापुरमठ व शिवानंद करी यांच्या हस्ते  सामनावीर सुरज सक्री व इम्पॅक्ट खेळाडू साईराज पोरवाल यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या सामन्यात  प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रशांत पाटील, रवी कुंदरनाड व मोहम्मद ताहीर सराफ यांच्या हस्ते सामनावीर मोहम्मद हमजा व इम्पॅक्ट खेळाडू कौस्तुभ पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.