भारतीय महिला संघाची विजयी सलामी
वनडे मालिका, न्यूझीलंडचा 59 धावांनी पराभव, अष्टपैलू दीप्ती सामनावीर, राधा यादवचे 3 बळी
वृत्तसंस्था/अहमदाबाद
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत गुरुवारी येथे झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान भारतीय महिला संघाने न्यूझीलंडवर 59 धावांनी मात करत विजयी सलामी दिली. अष्टपैलू दीप्ती शर्मा सामनावीरची मानकरी ठरली. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा डाव 44.3 षटकात 227 धावांत आटोपला. त्यानंतर भारताच्या अचूक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणासमोर न्यूझीलंडचा डाव 40.4 षटकात 168 धावांत आटोपला.
भारताच्या डावामध्ये नवोदीत तेजल हसबनीसने 64 चेंडूत 3 चौकारांसह 42, दिप्ती शर्माने 51 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 41, रॉड्रिग्जने 36 चेंडूत 1 चौकारासह 35, यास्तिका भाटियाने 43 चेंडूत 5 चौकारांसह 37, शेफाली वर्माने 22 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 33 तसेच रे•ाrने 14 धावांचे योगदान दिले. हरमनप्रित कौरच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व करणारी स्मृती मानधना 5 धावांवर बाद झाली. भारताच्या डावामध्ये 2 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. भारताने पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 69 धावा जमविताना 2 गडी गमविले. भारताचे अर्धशतक 41 चेंडूत, शतक 109 चेंडूत तर दीड शतक 158 चेंडूत आणि द्विशतक 227 चेंडूत नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे अॅमेलिया केरने 42 धावांत 4 तर तिची बहीण जेस केरने 49 धावांत 3 तर कार्सनने 42 धावांत 2 गडी बाद केले. बेट्सने 30 धावांत 1 बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक
भारत 44.3 षटकात सर्वबाद 227 (शेफाली वर्मा 33, भाटिया 37, रॉड्रिग्ज 35, तेजल हसबनीस 42, दिप्ती शर्मा 41, रेड्डी 14, अवांतर 12, अॅमेलिया केर 4-32, जेस केर 3-49, कार्सन 2-42, बेटस् 1-30), न्यूझीलंड 40.4 षटकात सर्वबाद 168 (प्लिमेर 25, डाऊन 26, हॅलीडे 39, ग्रिन 31, अॅमेलिया केर नाबाद 25, राधा यादव 3-35, सईमा ठाकुर 2-26, दिप्ती शर्मा 1-35, रेड्डी 1-21)