For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडियन, सोमनाथ, एवायएम, जैन यांची विजयी सलामी

10:23 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंडियन  सोमनाथ  एवायएम  जैन यांची विजयी सलामी
Advertisement

महांतेश कवटगीमठ चषक ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा : मोपीन विनायक, अक्षय, गिरीश, विनायक सामनावीर

Advertisement

बेळगाव : मराठा स्पोर्ट्स क्लब आयोजित महांतेश कवटगीमठ निमंत्रितांच्या ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात इंडियन सोल्जर्स, सोमनाथ डेव्हलपर्स, एवायएम अनगोळ, जैन इलेव्हन संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. मोपीन विनायक, अक्षय पाटील, गिरीश व विनायक यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मालिनी सिटी मैदानावर खेळविण्यात आलेल्या आजच्या पहिल्या सामन्यात महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 60 धावा केल्या. त्यात नामदेवने 16 धावांचे योगदान दिले. इंडियन सोल्जर्सतर्फे शकीलने 3 तर विनोदने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंडियन सोल्जर्स संघाने 6.3 षटकात 3 गडी बाद 62 धावा करून सामना सात गड्यांनी जिंकला. त्यात मोपीन विनायकने नाबाद 25 तर जग्गूने 22 धावा केल्या.

दुसऱ्या सामन्यात सोमनाथ डेव्हलपर्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 100 धावा केल्या. त्यात गिरीश व सैफ यांनी प्रत्येकी 31 धावा केल्या. श्रेयस स्पोर्ट्सतर्फे राहुलने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रेयस स्पोर्ट्सने 8 षटकात 9 गडी बाद 59 धावाच केल्या. त्यात राहुलने 22 धावा केल्या. सोमनाथ डेव्हलपर्सतर्फे 3 गडी बाद केले. तिसऱ्या सामन्यात एवायएम अनगोळने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 77 धावा केल्या. त्यात मुद्दसरने 33 तर आकाश असलकरने 14 धावा केल्या. नुरानी स्पोर्ट्सतर्फे कपिल बाळेकुंद्रीने 5 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना नुरानी स्पोर्ट्सने 8 षटकात 6 गडी बाद 72 धावाच केल्या. महेशने 39 धावा केल्या. एवायएमतर्फे उमरने 4 गडी बाद केले. चौथ्या सामन्यात जैन इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकात 5 गडी बाद करताना 96 धावा केल्या. त्यात प्रवीण शेरीने 33 तर आदिनाथने 28 धावा केल्या. डेपोतर्फे नागराज व मंजुनाथने प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना डेपो मास्टर्सने 8 षटकात 9 गडी बाद 70 धावा केल्या. त्यात समीर रेडेकरने 25 धावा केल्या. जैनतर्फे अक्षयने 3 आर्यन व स्वयमने प्रत्येकी दोन गडी बाद केले. या स्पर्धेचे युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आल्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या सामने पहावयास मिळत आहेत.

Advertisement

गुरुवारचे सामने

  • मराठा स्पोर्ट्स विरुद्ध शिवनेरी स्पोर्ट्स अनगोळ सकाळी 9 वाजता
  • इंडियन आर्मी विरुद्ध एवायएम ए सकाळी 10.30 वाजता
  • मोहन मोरे विरुद्ध स्टार इलेव्हन अनगोळ दुपारी 12 वाजता
  • अलरझा विरुद्ध हनुमान स्पोर्ट्स दुपारी 2 वाजता.
  • दुसऱ्या सामन्यातील विजेता विरुद्ध तिसऱ्या सामन्यातील विजेता यांच्यात 3 वाजता
Advertisement
Tags :

.