बेळगाव स्पोर्ट्स क्लबची विजयी सलामी
जिमखाना चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित 14 वर्षाखालील मुलांच्या आंतर अकादमी 50 षटकांच्या एक दिवसीय युनियन जिमखाना चषक क्रिकेट स्पर्धेत बेळगाव स्पोर्टस संघाने लायाज क्रिकेट अकादमी संघाचा सहा गड्याने पराभव करून विजयी सलामी दिली. अवनीश बसुर्तेकरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावर सकाळी उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे संजय पोतदार व चंदन कुंदरनाड यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी राहुल नाईक, मिलिंद चव्हाण, महांतेश देसाई, प्रशांत लायंदर, सोमनाथ सोमण्णाचे व अनिल गवि आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनाच्या सामन्यात लायाज क्रिकेट अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 48.1 षटकात सर्व बाद 106 धावा केल्या. स्वयम् खोतने 15, सुरज सक्रीने 14, रणजीतने 11 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे अवनीश बसुर्तेकरने 8 धावात 5 गडी तर मयूर जाधवने 25 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स संघाने 25 षटकात 4 बाद 107 धावा करून सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात इम्तियाज मंडलने 47, प्रज्योत उघाडे याने 17, सचिन तलवारने 12 धावा केल्या. लायाज अकादमीतर्फे रणजीत आर्या व यश चौगुले यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. अवनीश बसुर्तेकर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.