Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात विजयी मिरवणूकांवर बंदी!
मतमोजणीच्या दिवशी लाऊडस्पीकर, गुलाल व फटाके बंद
कोल्हापूर : जिल्ह्यातील जिल्ह्यापरिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक काढणे, विजयी मेदवारांच्या कार्यकत्यांनी अथवा कोणत्याही व्यक्ती/राजकीय पक्ष/संस्थांनी गावातून किंया शहरातून मिरवणूक/र ती काढणे, हीजे किंया डॉल्बी सिस्टीम लावणे, मोटार सायकलचे सायलेन्नार काढून वाहन चालविणे, सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळणे अथवा त्याचा वापर करणे तसेच फटाके लावणे/फोडणे यास मनाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडङ्गुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान व ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातीत जिल्हा परिषद व पंचायत समिती सद्दीतील मतवार संपामध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्बंध लागू केले आहेत निवडणूक प्रक्रिया विनाअडथळा व भयमुक्त वातावरणात पार पाहण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६२ अन्वये मतवार संघाच्या हद्दीत ९ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मतदान केंद्राच्या परिसरामध्ये निर्बंध लागू केले आहेत.
निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय करता येणार नाही. लाऊड स्पिकरचा वापर सकाळी ६ वाजण्यापूर्वी व रात्री १० नंतर करता येणार नाही कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय व्यासपिठावर किंवा फिरत्या वाहनावर बसवून करता येणार नाही. जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या वेळेपासून ४८ तास अगोदर लाऊड स्पिकरचा वापर करता येणार नाही. कोणत्याही उमेदवारास निवडणूक प्रचारच्या अनुषंगाने मतदान केंद्र ठिकाणाजवळ किंवा धार्मिक स्थळे, दवाखाने, शैक्षणिक संस्था परिसरात तात्पुरते पक्ष कार्यालय उघडता येणार नाही.