महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तामिळ थलैवाजचा बंगालवर विजय

06:49 AM Nov 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नोएडा

Advertisement

2024 च्या प्रो-कबड्डी लीग फुटबॉल स्पर्धेतील येथील नोएडा इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात तामिळ थलैवाजने बंगाल वॉरियर्सचा 46-31 अशा 15 गुणांच्या फरकाने पराभव केला.

Advertisement

या सामन्यात तामिळ थलैवाज संघातील नितीशकुमार, मोईन शेफागी, अमीर हुसेन आणि विशाल चहल यांची कामगिरी दर्जेदार झाली. तामिळ थलैवाजचा प्रमुख रायडर विशाल चहलने सुपर 10 गुण नोंदविले. बंगाल वॉरियर्स संघातील आघाडी फळीत खेळणाऱ्या एस. विश्वासच्या सुपर चढाईवर बंगाल वॉरियर्सने पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीत तामिळ थलैवाजवर 4 गुणांची आघाडी मिळवली होती. पण त्यानंतर विशालच्या अप्रतिम चढायांमुळे तामिळ थलैवाजने ही पिछाडी झटपट भरुन काढली. विशालने बंगाल वॉरियर्सचे 3 खेळाडू बाद करत सुपर 10 गुण मिळविले. बंगाल वॉरियर्सचे यावेळी सर्व गडी बाद झाले. या कामगिरीमुळे तामिळ थलैवाजने 3 गुणांची बडथ मिळवली.

सामन्याच्या मध्यंतरापर्यंत तामिळ थलैवाजने बंगाल वॉरियर्सवर 18-16 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या उत्तरार्धात पहिल्या 5 मिनिटातच तामिळ संघाने आपली आघाडी वाढवली. बंगाल वॉरियर्सचे दुसऱ्यांदा सर्व गडी बाद झाल्याने तामिळ थलैवाजने 6 गुणांची आघाडी मिळवली. मोईन शफागीने आपल्या चढाईवर बंगाल वॉरियर्सचे 3 गडी बाद केले. तर तामिळ थलैवाज संघातील नरेंद्र कांडोलाने 500 गुणांचा या लीग स्पर्धेत टप्पा गाठला. बंगाल वॉरियर्सच्या नितीनकुमार आणि विश्वास यांनी कडवा प्रतिकार केला. पण तामिळ थलैवाजने हा सामना अखेर 15 गुणांच्या फरकांनी जिंकला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article