मराठा मंडळ, ज्ञानप्रबोधन संघांची विजयी सलामी
09:22 AM Nov 19, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
पहिल्या सामन्यात एमव्हीएमने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडीबाद 112 धावा केल्या. त्यात श्रेयसने 28 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना मराठा मंडळने 19.3 षटकात 3 गडीबाद 113 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. सर्वज्ञ पाटीलने 4 चौकारासह 35 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात ज्ञानप्रबोधने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडीबाद 178 धावा केल्या. त्यात पार्थ उचगावकरने 53, आयुश सरदेसाईने 35 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना ब्लुमींग बर्डचा डाव 113 धावात आटोपला. वेदांत बिर्जेने 4 गडीबाद करत सिंहाचा वाटा उचलला.
Advertisement
फिनिक्स चषक क्रिकेट स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन,सर्वज्ञ पाटील, वेदांत बिर्जे सामनावीर
Advertisement
बेळगाव : होनगा येथील फिनिक्स निवासी शाळा आयोजित तिसऱ्या फिनिक्स चषक 17 वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत मराठा मंडळने एमव्हीएमचा 7 गड्यांनी तर ज्ञानप्रबोधनने ब्लुमिंग बर्डचा पराभव करून विजयी सलामी दिली. सर्वज्ञ पाटील मराठा मंडळ, वेदांत बिर्जे ज्ञान प्रबोधन यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. फिनिक्स स्कूलच्या मैदानावरती या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी उद्योजक अभय टुमरी, डेव्हीड इब्राहीम, महांतेश गवी, अरूण कांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
Advertisement
Advertisement
Next Article