महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव स्पोर्ट्स क्लब, कर्नाटक स्टार, हुबळी स्पोर्ट्स क्लब संघांची विजय सलामी

10:10 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : हुबळी येथे  कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए धारवाड विभागीय 19 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी बेळगाव स्पोर्ट्स क्लब, कर्नाटक स्टार स्पोर्ट्स क्लब, हुबळी स्पोर्ट्स क्लब संघाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून प्रत्येकी 4 गुण मिळवले. बेळगाव ऑटोनगर येथील केएससीए मैदानावर घेण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 47 षटकांत सर्व गडी बाद 201 धावा केल्या. त्यात अर्णव कुंदपने 10 चौकारांसह 79, काविश मुक्कण्णवरने 5 चौकारांसह 34, केदारनाथ तोडकरने 2 षटकारसह 17, जसवंतने 14 , सिद्धाप्पा पुजारीने 13 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे अर्जान, स्वरूप, प्रणित त्यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरदाखल खेळताना युनियन जिमखाना संघाचा डाव 49.3 षटकात 190 धावांत आटोपला. त्यात प्रतीक कराडेने दोन षटकार चार चौकारांसह 36, साईराज साळुंखेने 4 चौकारांसह 34, स्वयम वडेबैलकरने 19, अथर्व बेनकेने 16, तर प्रसंजितने 14 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे आर्यन कुंदपने 26 धावात 3, हर्ष पाटीलने 2 तर आर्नव कुंदप, अनिल पवार त्यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात कर्नाटक स्टार स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 39.3 षटकांत सर्व गडी बाद 227 धावा केल्या. त्यात सिध्दू सावजीने 2 षटकार 13 चौकारासह 84, रोहित यारीसिमीने 4 चौकारासह 28, अनमोल पागदने 22, विराटने 20 तर अमरगौडा पाटीलने 14 धावा केल्या. स्पोर्ट्स अकादमी गदगतर्फे नुमानने 2 तर झरदी, शाहीद, प्रेमकुमार व प्रविण यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरदाखल खेळताना स्पोर्ट्स अकादमी गदगचा डाव 37.2 षटकात 178 धावात आटोपला. त्यात झरीनने 2 षटकार 5 चौकारासह 43, मोसम्मद अजीमने 25, महम्मद जहीद अत्तार व युसूफ कडकोळ यांनी प्रत्येकी 24, प्रसादकुमारने 17 धावा केल्या. कर्नाटक स्टारतर्फे रोहित यारीसीमीने 26 धावात 3, तर सिध्दू व रमेश यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तिसऱ्या सामन्यात श्री सिद्धारूढ स्वामी स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 25.3 षटकांत 3 गडी बाद 46 धावा केल्या. त्यात झुबेरने 11 धावा केल्या. हुबळी स्पोर्ट्स क्लबतर्फे आयान सय्यदने 9 धावांत 3, विनायक पांडेने 17 धावांत 2, शब्बीर, संकेत हर्षित यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी स्पोर्ट्स क्लबने 5.1 षटकात 1 गडीबाद 48 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात आयुष पाटीलने 2 चौकार 1 षटकारासह 23, विजय बांडेने नाबाद 15 धावा केल्या. सिद्धारूढतर्फे प्रतिक नाईकने 1 गडी बाद केला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article