90 व्या वाढदिवशी 90 धावांनी विजय
विंडीजकडून कसोटी विजय सोबर्स यांना समर्पित
वृत्तसंस्था, त्रिनिदाद
मंगळवारी त्रिनिदाद येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्टड इंडीजने पाकिस्तानचा 90 धावांनी पराभव केला आणि दोन सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. नुकतेच दिवंगत झालेल्या सर गॅरी सोबर्स यांचा 28 जुलै हा 90 वा वाढदिवस होता. या सामन्यात ग्रीव्जला सामनावीराचा बहुमान मिळाला.
17 जुलै रोजी निधन झालेले सोबर्स यांनी 1954 ते 1974 या काळात वेस्ट इंडीजचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी 93 कसोटी सामन्यांत 57.78 च्या सरासरीने 8032 धावा केल्या. (यात 26 शतकांचा समावेश होता) आणि 235 बळीही घेतले. डावखुरा फलंदाज, डावखुरा गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांच्या अष्टपैलू क्षमतेसाठी जगभरात त्यांची प्रशंसा केली जात असे. त्यांच्या महान कामगिरीपैकी एक म्हणजे 1958 मध्ये पाकिस्तानविरुद्ध केलेली नाबाद 365 धावांची खेळी, हा त्या काळातील कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम होता. जो 36 वर्षे अबाधित राहिला.
चेसची समर्पित भावना
क्रिकेट विंडीजने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये बोलताना चेस म्हणाले, विंडीजच्या ड्रेसिंग रुममधील प्रत्येकासाठी हे क्रिकेटचे दिग्गज प्रेरणास्थान राहिले आहेत आणि संघाच्या कामगिरीचा त्यांना नक्कीच अभिमान वाटला असता. विंडीजच्या वरिष्ठ पुरूष क्रिकेट संघाच्यावतीने आम्ही हा विजय दिवंगत महान सर गारफिल्ड सोबर्स यांना समर्पित करू इच्छितो. ते या खेळातील एक दिग्गज आणि या ड्रेसिंग रुममधीला प्रत्येकाचे नायक आहेत. त्यांनी क्रिकेटच्या मैदानात सर्व काही साध्य केले आहे आणि ते इतके महान व्यक्तिमत्त्व आहेत की आज त्यांचा 90 वा वाढदिवस असता आणि आम्ही 90 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे हा विजय त्यांच्यासाठीच जणू नियतीने ठरवला होता, असे चेस म्हणाले.
विंडीजच्या कर्णधाराने सांगितले की, सोबर्स यांच्यासाठी हा विजय खास बनण्याबाबत संघाने चर्चा केली होती आणि हा महान क्रिकेटपटू त्यांच्याकडे पाहूनक स्मिमतहास्य करत असेल, अशी आशा व्यक्त केली. सर गारफिल्ड सोबर्स, वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी आपण जे काही योगदान दिले आहे, त्याबद्दल मी आपले आभार मानू इच्छितो. आम्ही आपल्याला अभिमान वाटेल, अशी कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण आनंदी असाल अशी आम्हाला आशा आहे आणि आपल्या आत्म्यास शांती लाभो, अशा भावना चेसने व्यक्त केल्या.
जेडेन सील्सने पाच बळी टिपले आणि यजमान संघाने पाकिस्तानचा दुसरा डाव 120 धावांत गुंडाळला. पाकिस्तानला विजयासाठी 211 ध्घवांचे लक्ष्य गाठायचे होते. पाकिस्तानचा हा परदेशातील सलग आठवा कसोटी पराभव ठरला तर वेस्ट इंडिजने मालिकेत विजयी आघाडी घेतली.
बाबर आझमने अर्धशतक झळकावले पण त्याला इतर फलंदाजींची साथ मिळाली नाही तर दुखापतग्रस्त शान मसूदला बोटाच्या फ्रँक्चरमुळे संघर्ष करावा लागला. विंडीज आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरी कसोटी 2 ऑगस्टपासून पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरू होणार आहे.