विकी कौशलला 'मॅडडॉक'च्या हॉरर कॉमेडीमध्ये करायचयं काम!
मुंबई
विकी कौशलचा आगामी छावा चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. या सिनेमात विकी कौशल सोबत रश्मिका मंधाना, अक्षय खन्ना अशी तगडी स्टार कास्ट आहे. या सिनेमा १४ फेब्रुवारीला सगळीकडे प्रदर्शित होणार आहे. छावाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. छावाच्या प्रमोशन दरम्यान एक चॅनेलला मुलाखत देताना अभिनेता विकी कौशल यांनी मॅडडॉक च्या हॉरर कॉमेडीमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
याप्रसंगी विकी कौशल म्हणाला, मला मॅडडॉक च्या हॉरर कॉमेडी मध्ये काम करायचं आहे. यानंतर मला हॉरर कॉमेडी मध्ये काम करायची इच्छा आहे. त्यातही मॅडडॉक सोबत संधी मिळाली तर आवडेलच.
या मुलाखतीदरम्यान दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले, हॉरर कॉमेडीसाठी अमर कौशिक आहेत. मी यापेक्षा चांगलं करु शकत नाही. अमर हे अतिशय हुशार दिग्दर्शक आहे. त्यांचे सिनेमे ६०० ते ७०० करोड च्या चौकटीतले आहेत. त्यांच्या चांगला होल्ड आहे.