For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोवा राज्य दिवस सोहळ्यात उपराष्ट्रपती प्रमुख पाहुणे

03:23 PM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोवा राज्य दिवस सोहळ्यात उपराष्ट्रपती प्रमुख पाहुणे
Advertisement

डॉ. सी. पी. राधाकृष्णन दोन दिवस गोव्यात

Advertisement

पणजी : गोवा घटक राज्यदिनी म्हणजे येत्या शनिवार 30 मे रोजी उपराष्ट्रपती डॉ. सी. पी. राधाकृष्णन हे गोवा भेटीवर येणार असून घटक राज्य सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे या नात्याने हजर राहणार आहेत. त्यांच्या गोवा भेटीसाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून त्यांचे आगमन, स्वागत यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. उपराष्ट्रपती 30 मेच्या पूर्वसंध्येला म्हणजे 29 मे रोजी सायंकाळी गोव्यात पोहोचणार असून शनिवारी 30 मे रोजी सकाळी 10 वा. पणजी येथील कला अकादमीत घटक राज्य दिनाचा सोहळा आखण्यात आला आहे.

तो कार्यक्रम झाल्यानंतर ते एनआयओ येथे भेट देणार असून तेथील संशोधकांकडे त्यांचा वार्तालाप होणार आहे. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर नामवंत मंडळी त्यावेळी उपस्थित राहणार आहेत. त्यांचा 29 मे रोजीचा मुक्काम राजभवनवर राहणार असून तेथूनच ते कला अकादमीकडे येणार आहेत. परत अकादमीकडून एनआयओकडे जाणार आहेत. त्यांच्या पणजी ते दोनापावला या प्रवासादरम्यान वाहतुकीत बदल किंवा त्यात काही वेळ खंडित करण्यात येणार आहे. राज्य सरकारने घटक राज्य दिनाच्या एकंदरित कार्यक्रमाची तयारी सुरू केली असून त्यासाठी निमंत्रणपत्रिका अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.