उपराष्ट्रपती धनखड एम्समध्ये दाखल
अशक्तपणा, छातीत दुखण्याचा त्रास : पंतप्रधानांकडून इस्पितळात जात विचारपूस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (73 वर्षे) यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. अशक्तपणा आणि छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाल्यानंतर रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. ते सध्या कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली क्रिटिकल केअर युनिटमध्ये (सीसीयू) उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे एम्सने जारी केलेल्या आरोग्य बुलेटीनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री जे. पी. न•ा स्वत: एम्समध्ये त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रविवारी एम्स रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ‘मी उपराष्ट्रपतींच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो’ असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. न•ा यांनीही रविवारी सकाळी एम्सला भेट देत धनखड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.