For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

150 अब्जच्या कर्जासाठी ‘व्हीआय’ची बँकांसोबत चर्चा

06:52 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
150 अब्जच्या कर्जासाठी  ‘व्हीआय’ची बँकांसोबत चर्चा
Advertisement

एसबीआयसह अन्य बँकांसोबतही बोलणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाची पुढील दोन वर्षांत आर्थिक स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत कंपनी 150 अब्ज रुपये म्हणजेच 1.80 अब्ज डॉलर कर्ज घेण्याची योजना आखत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक तसेच काही खासगी बँकांसारख्या सरकारी बँकांशी बोलणी सुरू आहे.

Advertisement

अहवालानुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया अनेक बँकांच्या संघाचे नेतृत्व करू शकते आणि हप्त्यांमध्ये व्होडाफोन आयडियाला कर्ज देऊ शकते. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की व्होडाफोन आयडियावर आधीपासूनच बरेच कर्ज आहे पण नव्याने बँकांकडून रक्कम कर्जाऊ रुपी प्राप्त झाल्यास व्होडाफोनला प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करण्यास मदत होईल. कंपनीने अलीकडेच 5जी सेवा लॉन्च करण्यासाठी आणि 4 जी नेटवर्क पुढे नेण्यासाठी 5 अब्ज डॉलरपेक्षा जास्त रक्कम उभारण्याची योजना आखली आहे. गेल्या महिन्यात, व्होडाफोन आयडियाने दुसऱ्या शेअर विक्रीतून (जे भारतातील सर्वात मोठे होते) रु. 1,600 कोटी उभारले आहेत. विक्री यशस्वी झाली आणि ऑफर केलेल्या समभागांपेक्षा 6.36 पट अधिक बोली प्राप्त झाली.

Advertisement
Tags :

.