For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हीआयला 51 हजार कोटीचा नफा

06:24 AM May 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
व्हीआयला 51 हजार कोटीचा नफा
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

देशातील तिसऱ्या नंबरची दूरसंचार कंपनी वोडाफोन आयडिया यांनी मार्च अखेरच्या चौथ्या तिमाहीत 51 हजार 970 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केल्याची माहिती आहे. सरकारने अलीकडेच त्यांच्या थकबाकी रकमेबाबत दिलासा देण्याचा निर्णय घेतला होता.  याचदरम्यान मार्चअखेरच्या तिमाहीतील कंपनीची कामगिरी लक्षणीय राहिली. अलीकडच्या वर्षांमध्ये पाहता पहिल्यांदाच सदरच्या दूरसंचार कंपनीने निव्वळ नफा प्राप्त केला आहे. यापूर्वी मागच्या वर्षी मार्च तिमाहीत 7167 कोटीचा तोटा कंपनीला झाला होता. तर या मागच्या तिमाहीमध्ये 5286कोटी रुपयांचा तोटा कंपनीला झाला होता.

बिर्ला प्रवर्तकांची गुंतवणूक

Advertisement

याच दरम्यान आदित्य बिर्ला समूहाचे प्रवर्तक कंपनीमध्ये 4730 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. ही वोडाफोनसाठी दिलासा देणारी बाब आहे. याच दरम्यान या प्रस्तावाला समभागधारकांची अद्याप मंजुरी मिळालेली नाही. कंपनीची सर्वसाधारण सभा 11 जून रोजी बोलावण्यात आली आहे. त्यात याबाबतचा निर्णय होऊ शकतो. अलीकडेच दूरसंचार विभागाने वोडाफोनवरील थकबाकी 87,695 कोटींवरुन 64,046 कोटींवर घटवली आहे.

समभाग वधारण्याची शक्यता

विविध फर्मनी वोडाफोनचा समभाग आगामी काळात वधारणार असल्याचे म्हटले आहे. जेएम फायनॅन्शीयल यांनी वोडाफोनचा समभाग 14 रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तवली आहे. युबीएस फर्मने समभाग सपाट स्तरावर राहणार असून 12 रुपयांपर्यंत पोहचू शकतो, म्हटलेय.

Advertisement
Tags :

.