‘व्हीआय’चे सुधारित रिचार्ज प्लॅन्स सादर
06:34 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
‘ट्राय’च्या इशाऱ्यानंतर दूरसंचार कंपन्यांची अंमलबजावणी सुरू
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘ट्राय’ने (टीआरएआय) अलीकडेच दूरसंचार कंपन्यांना कॉलिंग रिचार्जसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यानुसार सुधारित रिचार्ज प्लॅन जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नुकतेच व्होडाफोन-आयडियाने (‘व्हीआय’) भारतीय ग्राहकांसाठी सहा नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. हे नवीन प्लॅन्स स्वस्त आणि किफायतशीर आहेत. नव्या प्लॅन्सची किंमत 179 रुपयांपासून सुरू होते. या प्लॅन्समध्ये मोबाईल डेटा मिळणार नाही, परंतु एसएमएस सुविधा मिळेल. हे प्लॅन्स वेगवेगळ्या वैधता विभागांमध्ये सादर करण्यात आले असून त्यांची कमाल वैधता (व्हॅलिडिटी) 365 दिवसांची आहे.
Advertisement
Advertisement
