व्हीआय समूहाने 11,650 कोटींचे कर्ज भरले
10.9 कोटी पौंडची उभारणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यूके स्थित व्होडाफोन समूहाने सुमारे 11,650 कोटी रुपयांचे थकित कर्ज भरले आहे. यामध्ये व्होडाफोन आयडियामधील समभागांच्या बदल्यात 10.9 कोटी पौंड उभारले आहेत. कंपनीने शेअर बाजाराला सांगितले की, व्होडाफोन ग्रुपने कर्ज उभारण्यासाठी व्हीआयएलमधील जवळजवळ संपूर्ण भागभांडवल गहाण ठेवले आहे. मॉरिशस आणि भारतातील व्होडाफोन समूह संस्थांनी उभारलेल्या कर्जासाठी एचएसबीसी कॉर्पोरेट ट्रस्टी कंपनी (युके) च्या नावे शेअर्स तारण ठेवले होते.
स्टॉक एक्सचेंज फाइलिंगनुसार, एचएसबीसी कॉर्पोरेट ट्रस्टी कंपनी (यूके) लिमिटेड, व्होडाफोनच्या प्रवर्तक कर्जदारांसाठी सुरक्षा विश्वस्त म्हणून काम करत आहे. 27 डिसेंबर 2024 रोजी तारण शेअर्स जारी केले आहेत. व्हीआयएलमध्ये व्होडाफोन ग्रुपचा 22.56 टक्के हिस्सा आहे, तर आदित्य बिर्ला ग्रुपचा 14.76 टक्के आणि सरकारचा 23.15 टक्के हिस्सा आहे.