For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुर्टीतील पोलिस कॉन्स्टेबलसह पशुवैद्यक डॉक्टरला अटक

12:47 PM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुर्टीतील पोलिस कॉन्स्टेबलसह पशुवैद्यक डॉक्टरला अटक
Advertisement

प्रकाश राणे यांने घातला 40 लाखांचा गंडा : सागर नाईकने केली 15 लाखांची फसवणूक

Advertisement

फोंडा : सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून लाखो ऊपयांची फसवणूक केल्याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी संशयित पूजा नाईक या महिलेला अटक केल्याचे प्रकरण ताजे असतानाच फोंड्यात अशाच प्रकारच्या अन्य दोन फसवणुकीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या वेगवेगळ्या फसवणुकीच्या प्रकरणात एका पोलिस कॉन्स्टेबलसह निवृत्त पशुवैद्यक डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. शिक्षकाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऊ. 15 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कुर्टी फोंडा येथे राहणारा राखीव दलाचा पोलिस कॉन्स्टेबल सागर सुरेश नाईक याला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. आपली अटक चुकविण्यासाठी त्याने न्यायालयात जामीन अर्जही केला होता. मात्र रविवारी त्याला फोंडा पोलिसांनी गजाआड केले. दुसऱ्या प्रकरणात सरकारी नोकरीचे आमिष दाखवून चौघाजणांची ऊ. 40 लाखांना फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त पशुवैद्यक असलेल्या प्रकाश राणे या सिंधुनगर कुर्टी येथील संशयिताला अटक करण्यात आली आहे. संशयिताला अटक कऊन पणजी पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले. त्याच्याविरोधात उषा उर्फ शितल श्रीधर आश्वेकर, संतोष सुर्या गोवेकर, पूजा सीताराम खोर्जुवेकर व सुषमा गावस यांनी फोंडा पोलिसस्थानकात तक्रार दाखल केली होती.

प्रकाश राणे याने 2019 ते 2022 या कालावधीत वरील चारही तक्रारदारांकडून सरकारी नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून ऊ. 40 लाखांची रक्कम घेतली होती. मात्र नियोजित काळात नोकऱ्यांचे कॉल लेटर्स आले नसल्याने तक्रारदारांनी राणे याच्याकडे पाठपुरावा सुऊ केला. पण त्याच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने तक्रारदारांनी आपले पैसे परत करण्याचा तगादा लावला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर त्यांनी फोंडा पोलिसांत तक्रार नोंदविली व संशयित राणे याला अटक करण्यात आली. दुसऱ्या एका घटनेत राखीव दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या सागर सुरेश नाईक याने खासगी शाळेत शिक्षिकेची नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका महिलेकडून ऊ. 15 लाख घेतले होते. दोन वर्षांपूर्वी हा प्रकार घडला होता. आपली अटक चुकविण्यासाठी संशयिताने न्यायालयातही धाव घेतली होती. पण त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने अखेर फोंडा पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी अधिक तपास सुऊ आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.