महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याच्या पुत्राचा भाजपप्रवेश

05:15 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिवराज सिंह चौहानांकडून काँग्रेसला झटका

Advertisement

निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. रायसेन येथे त्यांनी काँग्रेसला खिंडार पाडले आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते योगेंद्र रघुवंशी यांना मुख्यमंत्री चौहान यांनी भाजपचे सदस्यत्व प्रदान केले आहे. योगेंद्र हे काँग्रेस नेते आणि माजी मंत्र्यांचे पुत्र आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यामुळे प्रभावित होत भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा योगेंद्र रघुवंशी यांनी केला आहे. रायसेन जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून योगेंद्र रघुवंशी यांना ओळखले जाते. बरेली भागात त्यांचा चांगला प्रभाव आहे. काँग्रेसमध्ये होत असलेल्या निरंतर उपेक्षेमुळे भाजपचे सदस्यत्व स्वीकारले असल्याचे योगेंद्र सिंह रघुवंशी यांनी सांगितले. माजी मंत्री जसवंत सिंह यांचे ते पुत्र आहेत. योगेंद्र सिंह यांच्या भाजप प्रवेशामागे सिलवानीचे आमदार रामपाल सिंह यांनी मोठी भूमिका बजावली आहे. योगेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या भोपाळ येथील निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article