महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे निधन

06:04 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

प्रसिद्ध अभिनेत्री आशा शर्मा (वय 88 वर्षे) यांचे रविवारी निधन झाल्यामुळे संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. आशा यांच्या निधनाची माहिती रविवारी दुपारी ‘सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’च्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आली आहे.

Advertisement

टीव्ही व्यतिरिक्त आशा यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या ‘दो दिशां’ या चित्रपटात उत्कृष्ट काम केले होते. तसेच ‘मुझे कुछ कहना है’, ‘प्यार तो होना ही था’ आणि ‘हम तुम्हारे हैं सनम’ या चित्रपटांमध्येही त्या झळकल्या. त्यांनी प्रभास आणि क्रिती सेननच्या ‘आदिपुऊष’ चित्रपटात अखेरचे काम केले होते. तसेच ‘कुमकुम भाग्य’, ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ आणि ‘एक और महाभारत’ सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

दिवंगत अभिनेत्री आशा शर्मा यांनी आपल्या चार दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत सुमारे 35 चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. आशा शर्मा हे टीव्ही जगतात एक प्रसिद्ध नाव आहे. आशा यांनी अनेक वर्षे चित्रपट आणि टेलिव्हिजन शोद्वारे लोकांमध्ये आपले विशेष स्थान निर्माण केले. आई आणि आजीच्या भूमिकेतील आशाला प्रेक्षकांनी विशेष पसंत केले होते. त्यांनी वयाच्या 88 व्या वषी अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला. अशा परिस्थितीत आता टीव्ही इंडस्ट्रीने आणखी एक स्टार गमावला आहे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article