ज्येष्ठअभिनेते टीकू तलसानिया यांना ह्रदयविकाराचा झटका
05:26 PM Jan 11, 2025 IST
|
Pooja Marathe
Advertisement
उपचारासाठी रुग्णालयात दाखल
प्रकृती गंभीर
मुंबई
ज्येष्ठ अभिनेते आणि कॉमेडीयन टीकू तलसानिया यांना ह्रदयविकाराच झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या टीकू यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Advertisement
ज्येष्ठ अभिनेते टीकू तलसानिया हे ७० वर्षांचे आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी, रुग्णालयाविषयी आणि उपचारांबद्दल अधिक कोणती माहिती समोर आली नाही आहे. टिकू यांनी २०२४ मध्ये 'विकी - विद्या का वो वाला व्हिडीओ' या सिनेमात अभिनय केला होता. याशिवाय 'सर्कस', 'स्पेशल २६', 'फिर हेरा फेरी', 'हंगामा', 'रिश्ते', 'देवदास' अशा अनेक सिनेमांमध्ये टिकू यांनी आपल्या अभिनयाची छबी दाखविली आहे. त्यांच्यावर योग्य उपचार होऊन, यातून ते लवकरात लवकर बाहेर पडावे अशी चाहत्यांची आशा आहे.
Advertisement
Advertisement
Next Article