For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फुलांच्या अखंडीत पायघड्या, धगधगत्या मशाली अन् चांगभलंचा गजर

12:32 PM Dec 02, 2024 IST | Pooja Marathe
फुलांच्या अखंडीत पायघड्या  धगधगत्या मशाली अन् चांगभलंचा गजर
Vetaldev Palakhi Ceremony in Shivaji Peth"
Advertisement

शिवाजी पेठेतील वेताळदेवाचा चैतन्यदायी वातावरणात पालखी सोहळा संपन्न

Advertisement

चार हजारावर भाविकांचा सहभाग

विद्यूत रोषणाई, आतषबाजीने उजळला पालखी मार्ग

Advertisement

कोल्हापूर

गुलालची उधळण, मार्गात भाविकांनी बनवलेली रांगोळी अन् फुलांची अखंड पायघडी, लहान मुलांच्या हातातील धगधगत्या मशाली, पारंपारिक वाद्ये, फटाकांची आतषबाजी आणि आकर्षक विद्यूत रोषणाई अशा चैतन्यदायी वातावरणात रविवारी रात्री शिवाजी पेठेतील वेताळ तालीम मंडळाच्या वतीने वेताळदेवाचा पालखी सोहळा साजरा करण्यात आला. वेताळदेव कार्तिक उत्सवानिमित्त आयोजित या सोहळ्यात शिवाजी पेठेतील तीन ते चार हजार भाविक सहभागी होते. त्यांनी वेताळबाच्या नावानं चांगभलं असा अखंडीत गजर करत पालखी मार्ग दुमदुमून सोडला. मार्गातील शेकडो कुटुंबीयांसह मंडळांनीही साजेसे असे पालखीचे स्वागत करतानाच फटाकांची आतषबाजीसुद्धा केली.
दीपावलीनंतर येणाऱ्या अमावस्येला वेताळदेव कार्तिक उत्सव साजरा करण्याची परंपरा वेताळ तालीम मंडळाने मोठ्या श्रद्धेने जपली आहे. वेताळ तालीम परिसरातील घराघरातील माहेरवाशीनी या उत्सवात न चुकता सहभागी होतात हे उत्सवाचे एक वेगळे वैशिष्ट्याच आहे. रविवारची सकाळ झाल्यानंतर वेताळ तालमीने वेताळदेव उत्सवाला आरंभ केला. तालीम परिसरातील अभिजीत यादव यांच्या हस्ते तालमीसमोरील जागेत स्थित वेताळदेवाला अभिषेक करण्यात आला. यानंतर शेकडो भाविकांनीही वेताळदेवाला दुग्धाभिषेक केला. कोल्हापुरी फेटा बांधून वेताळदेवाची महापूजाही बांधली. या पुजेचे दर्शन घेण्यासाठी दिवसभर भाविकांनी गर्दी पेली होती. सायंकाळी वेताळदेवाचा पालखी सोहळा साजरा केला. फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये वेताळदेवाची उत्सवमूर्ती विराजमान केली. यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पालखीचे पूजन केले. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, वेताळ तालीम मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, माजी नगरसेवक अदिल फरास, उत्तम कोराणे, उत्सव समिती अध्यक्ष अनुप पाटील, उपाध्यक्ष स्वप्निल टिटवेकर आदी उपस्थित होते. हातातील धगधगत्या मशाली घेतलेल्या मुलांसह भाविकांनी चांगभलंचा गजर केल्यानंतर पालखीला खांद्यावर घेत नगरप्रदक्षिणेसाठी आगेकूच केली. चांगभलंच्या सुरात सुर मिसळत चार हजार भाविकही सोहळ्यात सहभागी झाले. धनगरी ढोल, ढोल-ताशे, पी-ढबाक आणि हलगी ही पारंपरिक वाद्ये तालबद्ध वादन करत पालखी सोहळ्यात उत्साह भरत होती.
पालखीच्या स्वागतासाठी तर मार्गातील शेकडो कुटुंबीयांनी स्वयंस्फुर्तीने रांगोळी आणि फुलांच्या पाकळ्यांनी तयार केलेली पायघडी वेताळदेवावरील अपार श्रद्धा वृद्धींगत करत होती. इतकेच नव्हे तर वेताळ तालीम परिसरातील ज्या ज्या मार्गावऊन पालखीने प्रयाण केले, त्या त्या मार्गावर फुलांच्या पाकळ्यांची अखंडीत पायघडी हे पालखी सोहळ्याची भव्यता सिद्ध करत होती. मंडळांनी ही विद्यूत रोषणाईचा झगमगाट आणि फटाकांच्या आतषबाजीचा लखलखाटात करत पालखीचे जंगी स्वागत केले. फुले आणि गुलालाची उधळण करत केली. रात्री दहाच्या सुमारास पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्याचा चार हजारावर भाविकांनी लाभ घेतला.

Advertisement
Tags :

.