वेताळ- बांबर्डे गावचे ग्रामदैवत देव वेतोबाचा जत्रोत्सव उद्या
03:38 PM Dec 06, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
वार्ताहर/ कुडाळ
कुडाळ तालुक्यातील हायवेनजीक वसेलेले वेताळ बांबर्डे गावचे ग्रामदैवत श्री देव वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव कार्यक्रम उद्या गुरुवार दि 7 डिसेंबर 2023 रोजी संपन्न होणार आहे.सकाळी 9 वाजता श्रींचे विधिवत पूजन होऊन श्रीफळ अर्पण करणे, नवस फेडणे व आदिशक्ती सातेरी देवी वार्षिक भेटीची ओटी भरणा कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. रात्रौ 10 वाजता ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत श्रींची पालखी प्रदक्षिणा होऊन 12 वाजता पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे.समस्त वेतोबा भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन वेतोबा देवस्थान उपसमिती, श्री देव वेतोबा उत्सव मंडळ, देवराठीचे बारा पाच मानकरी व वेताळ बांबर्डे ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Advertisement
Advertisement