Kolhapur : वेताळ आणि वेताळाची पालखी ; काय आहे ही नेमकी परंपरा!
कोल्हापुरातील शिवाजी पेठेने जपलेली परंपरा
कोल्हापूर : गंगावेश ,तटाकडील तालीम ,खरी कॉर्नर ,मिरजकर तिकटी, रविवार वेश,बिंदू चौक,खोलखंडोबा, शिवाजी पुतळा,या पलीकडे मूळ कोल्हापूर नव्हतेच हे आता कोणाला सांगूनही पटणार नाही . या पलीकडे जे होते ती माळरानेच होती. काही पाणवठे होते .तिकडे कोण निघालं तर माळावर जाऊन येतो अशी म्हणायची पद्धत होती .सांगायचं झालं तर आत्ताची लक्ष्मीपुरी,राजारामपुरी हा तर गवताळ दलदलीचा परिसर होता .शाहूपुरी राजारामपुरी तर अगदी अलीकडे वसलेली . आणि कोल्हापूरच्या प्रत्येक वेशीवर दगडी शिळांची मंदिरे होती.
या मंदिरातले देव कोल्हापूरचे रक्षण करतात हेअशी आख्यायिका होती मूळ कोल्हापूरच्या बाहेर दक्षिणेस बाहेर माळावर असाच वसलेला एक देव म्हणजे वेताळ माळ.वेताळ हे नाव घेतले तरी भूत, पिशाच्च,हडळ यांची जोड वेताळाला जोडली जाते .त्यामुळे वेताळाच्या कथा म्हणजे दंतकथाचे आगार होते. पण रंकाळ्याच्या बाजूने शिवाजी पेठेच्या वेशीवर असलेला वेताळ त्याला अपवाद होता .वेताळाचे प्रतीक असलेल्या शिळा .त्यावर छत नाही .पण लगतच्या पिंपळाची या वेताळावर कायम सावली राहिली दिवसभर वेताळ या पिंपळाच्या सावलीत आणि रात्री रंकाळ्याकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे पिंपळाची रात्रभर सळसळ असायची या परिसरात वस्ती नव्हती या पिंपळाची सळसळ आणि वेताळा समोर लावलेल्या तेलाच्या मं दिवट्यांचा गुढप्रकाश . त्यामुळे खरोखरच या भागात रात्री यायला लोक कचरायचे . सकाळी मात्र न चुकता दर्शनाला यायचे .
आता या वेताळाभोवती खूप दाट वस्ती झाली आहे .त्याच्या नावाची तालीमही आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याच्या पालखीचा सोहळा आहे .वेताळ म्हटलं तरी .आबा तोबा आबा तोबा असे लोक म्हणायचे .पण शिवाजी पेठेतील हा वेताळ जरा वेगळाच . या वेताळाची जरबआहे .पण या वेताळासमोर अंगात आलेला,भुताने झपाटलेला, तंत्र मंत्र करणारा असा कोणीही येऊ शकत नाही .कारण तेथे असले काही चालणार नाही हे त्या परिसरातील रहिवाशांनी ठरवले आहे .आणि फक्त वेताळावर श्रद्धा ठेवावी अशीच या परिसरात भावना आहे .
वेताळ म्हणजे भुताला खांद्यावर घेऊन फिरणारा अशा गोष्टी लहान पासून आपण प्रत्येकाने ऐकलेल्या . पण इथे तसा प्रकार नाही . उलट आपल्या दारात पालखीतून वेताळ आला याचा वेगळा आनंद या परिसरातील रहिवाशांना आहे .त्यामुळे उद्या निघणाऱ्या पालखीच्या वेळी पालखीच्या पारंपारिक मार्गात रांगोळी, फुलांच्या पाकळीचा सडा,रोषणाईचा झगमगाट,फटाक्याची आतषबाजी केली जाते. आणि त्याचा खर्च त्या त्या गल्लीच्या वतीने केला जातो . त्यानंतर महाप्रसाद होतो . चूल बंद,गॅस बंद असाच या परिसरातला हा महाप्रसाद असतो . या वेताळाबद्दल एकही दंतकथा नाही . माझ्या अंगात वेताळ आलाय म्हणून कोणी हूं हूं करत नाचू लागला तर त्याला वेताळा समोर थांबवून घेतले जात नाही .भूत,पिशाच्च,हडळ याची चर्चाही येथे करू दिली जात नाही . त्यातला धार्मिक भाग क्षण भर बाजूला ठेवा . पण हे मात्र खरे की या वेताळाला चारही बाजूने दाट वस्तीने घेरले आहे .वेताळ माळ नावातील माळ आता संपला आहे .
फक्त तालमीच्या फलकावरच वेताळ माळ या शब्दामुळे तो शिल्लक आहे . बाकी सारा माळा घर, बंगले, अपार्टमेंट यांनी फुल्ल भरला आहे . या परिसरातील रहिवासी या वेताळाला श्रद्धेने खूप मानतात. त्यामुळे त्या पर परिसरातील सर्व घडामोडीचा साक्षीदार हा वेताळच आहे . कोल्हापुरातील आजच्या या पिढीला वेताळ फारसा माहित नाही . सोलापूर शहर आज चौफेर पसरलेले आहे आणि तिकडचे कोणी फारसे वेताळमाळाकडे येत नाही त्यामुळे कोल्हापूरचे हे सामाजिक धार्मिक ठिकाण या पिढीला माहीत नाही कोल्हापूर किती वैविध्यने भरले आहे त्याचा पुरावा म्हणजे वेताळ माळ आहे आजही तो जपला गेला आहे धार्मिक राहू दे पण सामाजिक अंगाने किंवा जुने कोल्हापूर कसे होते हे पाहण्यासाठी तरी नव्या पिढीने वेताळ माळला येणे आवश्यक आहे . कारण मूळ कोल्हापूरचे अस्तित्व या ना त्या निमित्ताने जपले गेले आहे .