कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अत्यंत दुर्लभ असलेला रोग

06:39 AM Mar 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हसणे हा काही रोग असू शकतो का? हा प्रश्न विचित्र वाटत असला तरीही याचा संबंध एका दुर्लभ रोगाशी आहे. या रोगाचा शोध सुमारे 50 वर्षांपूर्वी लागला होता. हा रोग अत्यंत दुर्लभ असून जगातील एका भागात तो लोकांचा दरवर्षी जीव घेत आहे. कुरू की या रोगाला लाफिंग सिकनेस असेही म्हटले जाते. सर्वात अजब बाब म्हणजे आजाराचे नाव नसून ज्या कारणामुळे हा रोग होतो ते आहे. कुरु नाव अजब वाटत असले किंवा भारतीय पौराणिक कथांमधील वाटत असले तरीही लोकांनी याचे दुसरे नाव लाफिंग डिसिज किंवा लाफिंग डेथ ऐकताच त्यांची जिज्ञासा वाढते. 1950 च्या दशकात पापुआ न्यू गिनीमध्ये या रोगाचा शोध लागला होता. याच्या पडताळणीने संशोधक चकित झाले होते.

Advertisement

Advertisement

पापुआ न्यू गिनी येथील भागात पोहोचल्यावर संशोधकांनी तेथील फोर समुदायाशी संपर्क केल्यावर अजब बाब आढळून आली. 11 हजार लोकसंख्या असलेल्या समुदायात एक अजब रोग फैलावल्याचे आणि यामुळे दरवर्षी सुमारे 200 लोकांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले. हा रोग एखादे संक्रमण किंवा जेनेटिक्समुळे होत असल्याचे प्रारंभी संशोधकांना वाटले.

अत्यंत वेगळे कारण

संशोधकांनी बहुतांश मुले आणि प्रौढ महिलांना होणाऱ्या रोगाची पडताळणी केली. याचा निष्कर्ष धक्कादायक होता, कारण हा रोग परिवाराच्या मृत लोकांचा मेंदू खाण्याच्या परंपरेमुळे होत होता. संशोधकांनी हा रोग कशामुळे होतो हे शोधून काढले होते.

विचित्र परंपरा

शरीर जेव्हा दफन केले जाते, तेव्हा ते किड्यांकडून खाल्ले जाते, परंतु फोर समुदायाचे लोक परिवारातील मृताचे शव किड्यांनी खाण्याऐवजी ते परिवाराच्या अन्य सदस्यांनी खाणे चांगले असल्याचे मानत होते. परंतु यामुळे होणाऱ्या रोगाबद्दल कळल्यावर ही परंपरा बंद करण्यात आली आहे. एखाद्या मेंदूचा संक्रमित हिस्सा खाल्ल्यावर हा रोग होतो. याचा प्रभाव खूपच धोकादायक अन् अजब आहे. हा रोग थेट मेंदूवर प्रभाव पाडतो. रोग झाल्यावर माणसाला चालण्यास, वर्तनात आणि मूडमध्ये बदलाला सामोरे जावे लागते. डिमेंशिया, खाताना त्रास सहन करावा लागतो. अनेक संक्रमित लोकांमध्ये आजही या रोगाची लक्षणे दिसून येतात असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article