अष्टपैलू अटलजी
हिंदू तनमन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय! असा आपला परिचय देणारे भारतरत्न माजी पंतप्रधान श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी यांची 25 डिसेंबर 2024 रोजी जन्मशताब्दी आहे. त्यानिमित्त...
श्रध्देय अटलजींचा जन्म मध्यप्रदेशात ग्वालियरमध्ये शिंदेंच्या छावणीत 25 डिसेंबर सन 1924 च्या ब्रम्हमुहुर्तावर झाला. योगायोग असा की त्याच दिवशी प्रभू येशू ख्रिस्तांचाही जन्मदिवस होता. खरंतर अटलजींना आपला वाढदिवस मनापासून साजरा करायला आवडत नसे. त्यांनी आपल्या ‘नये मिलका पत्थर’ या कवितेतून सुचित केले होते. ते म्हणतात:- ‘केवल काया जीती-मरती. इसलिये उम्रका बढना भी त्योहार हुआ. नये मील का पत्थर पार हुआ’
उम्रका बढना त्योहार हुआ या ओळी खूप काही सांगून जातात. राजकारणात राहून अजात शत्रू असणारा नेता प्रतिथयश कवि, अपराजेय वक्ता, संवेदनशील व्यक्ती, मंत्रमुग्ध करणारी वाणी, साधी रहाणी, उच्च विचारसरणी असणारे लोकप्रिय पंतप्रधान, तसेच खाण्याची व भोजन करण्याची तेव्हढीच ऊची ठेवणारे, अटलजी खिचडीचेही शौकिन होते. मानवी जीवनाप्रमाणेच राजकीय पक्षाचेही जीवन सतत बदलत/विकसित होत राहते. काळ बदलतो, शक्ती वाढत असते.
भारतीय जनता पार्टीचा प्रवास :- जनसंघ-जनता पार्टी, भारतीय जनता पार्टीचा संघर्षमय प्रवास शून्यातून विश्व निर्माण करणारा ठरला. स्थापनेपासूनच पक्षाची शक्ती वाढत राहिली. पिढ्या बदलल्या, नेते बदलले तरीही पक्षाचा प्रवाह खळखळतंच राहिला. मूळ विचारधारा पुढे नेणारे नव्या पिढीतले नवे नेतृत्व उभे राहिले. याचे कारण या विचारधारेचा कस बावनकशी होता. त्याचा पाया 1980 साली भारतीय जनता पार्टीच्या ऊपाने भक्कम उदयाला आला. भारतीय जनता पार्टीचे प्रथम राष्ट्रीय अध्यक्ष अटलजींच्या नावाची घोषणा झाली व एकच जयघोष आसमंतात दुमदुमला. त्यावेळचे भारतीय जनता पार्टीचे प्रथम अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या भाषणाने हा पाया अधिकच भक्कम झाला. ‘मी हे जाणतो की भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षपद हा काही एखादा अलंकार नव्हे, वस्तुत: हे पद नव्हे तर आव्हान आहे. परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की, तो मला शक्ती आणि विवेक देवो, ज्यामुळे मी ही जबाबदारी योग्य रीतीने पार पाडू शकेन.’ पुढे ते म्हणतात, ‘आम्ही तर एका हातात भारताची राज्यघटना आणि दुसऱ्यामध्ये समतेचे निशाण घेऊन मैदानात लढू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि संघर्ष यांच्यापासून प्रेरणा घेऊ. सामाजिक समतेचा बिगुल फुंकणारे महात्मा फुले आमचे पथदर्शक असतील.’ विचारांची ऊंची असणारे असे हे श्रध्देय अटलजी खरंतर द्रष्टेही होते. प्रथम अध्यक्ष या नात्याने केलेल्या भाषणाचा समारोप करताना ते म्हणतात, ‘भारताच्या पश्चिम किनाऱ्याला सुशोभित करणाऱ्या महासागराच्या तटावर उभा राहून मी अशी भविष्यवाणी करण्याचे धाडस करतो की, अंधार नाहीसा होईल, सूर्य उगवेल, कमळ उमलेल’ आणि ही भविष्यवाणी आज खरी झालेली आपण पाहतोय. राजनेता आणि कवि असा अलौकिक संगम म्हणजे
अटलजी.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सेनानींबद्दल ते लिहितात :-
‘जो बरसोंतक लढे जेलमे उनकी याद करे
जो फांसीपर चढे, खेल में उनकी याद करे
याद करें काला पानी को
अंग्रेजोंकी मनमानीको
कोल्हूमे जूट तेल पेरते
सावरकर से बलिदानी को.’
सावरकरांना झालेली काळया पाण्याची शिक्षा, अनेक वर्षे जेलमध्ये सोसलेले हाल, अशक्त असतानांही कोळूवर त्यांना तेल काढावे लागत असे. अशा सपूतासाठी या कवितेत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अटलजींचे वडील कृष्णबिहारी वाजपेयी हे प्रख्यात कवि होते. अटलजी संवेदनशील मनाचे होते, कोणावरही अन्याय वा अत्याचार झालेला त्यांना सहन होत नसे. महिलांवरील अत्याचाराने तर ते व्यथित व्हायचे, आजही महिला सुरक्षित नाहीत. तिची लाज राखणारा कोणी दिसत नाही. महाभारतातल्या प्रतिकाचा वापर कऊन कौरव पांडव या कवितेत ते म्हणतात:-
कौरव कौन
कौन पांडव,
टेढा सवाल है
दोनो ओर शकुनी
का फैला
कुटजाल है..
ही कविता आपल्यालाही अंर्तमुख करते.
1996 ला 10 वी लोकसभा जिंकल्यावर पंतप्रधान अटलजींना विश्वासमत ठरावाला सामोरे जावे लागले होते. 13 दिवसांचे सरकार केवळ 1 मताने पडले होते. 1 मतासाठी त्यांनी सौदेबाजी केली नाही. आणि अटलजींनी आपला
राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपुर्द केला. त्या दिवशीचे संसदेतले त्यांचे भाषण आजही गाजते आहे. लोकशाहीवर विश्वास ठेवणारे ते नेते होते. देशामध्ये कधी ध्रुवीकरण होऊ देऊ नये, असे ठाम मत त्यांचे होते. ‘सरकारे आयेगी जायेगी, पार्टीया बनेगी
बिगडेगी, लेकिन देश अबादित रहना चाहिये, देशका लोकतंत्र जिवीत और विकसित रहना चाहिये. मजबूत रहना चाहिए’
संसदेत त्या भाषणात त्यांनी या भावना आपल्या व्यक्त केल्या होत्या.
त्यांच्या वाढदिवशी केलेल्या कवितेने समारोप करते-
हर पचीस दिसंबरको
जिनेकी नई सीडी चढता हुँ
नए मोडपर
औरेंसे कम स्वयंसे ज्यादा लढता हुँ
मेरा मन तुझे अपनीही अदालत में खडा कर
जब जिरह करता है
मेरा हलफनामा मेरेही खेलाफ पेश करता है
तो मै मुकदमा हार जाता हुँ
आत्मपरिक्षण करणारे अष्टपैलू, अजातशत्रु भारतरत्न माजी पंतप्रधान अटलजींना जन्मशताब्दीसाठी शतश: वंदन.
- डॉ.कांता नलावडे,
माजी राष्ट्रीय महिला अध्यक्षा, भा.ज.पा. व माजी आमदार