For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेर्ले ग्रामस्थांचा बीएसएनएल अधिकाऱ्यांना घेराव

06:08 PM Jul 22, 2025 IST | अनुजा कुडतरकर
वेर्ले ग्रामस्थांचा बीएसएनएल अधिकाऱ्यांना घेराव
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले ,कलंबिस्त, सांगेली ,शिरशिंगे ,सावरवाड पंचक्रोशीत दूरसंचार विभागाचे तीन टॉवर्स आहेत. पण दूरसंचारचे मोबाईल नेटवर्कच नसल्याने आम्ही मोबाईलचे रिचार्ज मारायचे कशाला ? नेटवर्क मिळत नसेल तर आता दूरसंचारचे सिम हवे कशाला अशी भूमिका या पंचक्रोशीतील दूरसंचार ग्राहकांनी घेत दूरसंचारच्या सेवेबद्दल नाराजी व्यक्त केली . दूरसंचार सेवेच्या सावळ्या गोंधळाबाबत वेर्ले गावातील ग्रामस्थ एकवटत मंगळवारी सावंतवाडी येथील दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला . येत्या आठ दिवसात मोबाईल सेवा सुरळित न झाल्यास पंचक्रोशीतील सर्व टॉवर ग्रामस्थ बंद पाडतील. तसेच सिम कार्ड दूरसंचार कार्यालयाकडे जमा करण्याचा इशारा ग्रामस्थांनी देताच दूरसंचार विभागाचे अधिकारी मनोज मातुर व मंडल अधिकारी एन एस गायकवाड यांनी येत्या 25 जुलैला वेर्ले गावात जाऊन मोबाईल टॉवरची पाहणी केली जाईल असे आश्वासन दिले . यावेळी उपसरपंच मोहन राऊळ, सामाजिक कार्यकर्ते डॉ संजीव लिंगवत,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे दिलीप राऊळ , माजी उपसरपंच चंद्रकांत राणे , प्रसाद गावडे , नारायण राणे ,राजन राणे ,पुंडलिक कदम यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी दूरसंचार विभागाच्या कार्यालयाला ग्रामस्थांनी धडक दिली .

Advertisement
Advertisement
Tags :

.