For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

वेर्ले येथील श्रीदेवी पावणाई रवळनाथ मंदिर परिसराचे होणार सुशोभीकरण; पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ; आमदार दीपक केसरकर यांच्या निधीतून विकासकाम

01:31 PM Oct 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
वेर्ले येथील श्रीदेवी पावणाई रवळनाथ मंदिर परिसराचे होणार सुशोभीकरण  पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ  आमदार दीपक केसरकर यांच्या निधीतून विकासकाम
Advertisement
सावंतवाडी (प्रतिनिधी) : वेर्ले येथील श्रीदेवी पावणाई रवळनाथ मंदिर परिसराचे सौंदर्य आता अधिक खुलणार आहे. मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, यामुळे मंदिर परिसर अधिक सुबक आणि आकर्षक होणार आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या निधीतून हे काम करण्यात येत आहे. या विकासकामाचे भूमिपूजन शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

वेर्ले गावातील श्रीदेवी पावणाई रवळनाथ मंदिराला धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यात यावेत, अशी ग्रामस्थांची मागणी होती. यासाठी माजी सरपंच चंद्रकांत राणे यांनी विशेष पुढाकार घेऊन सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे.

Advertisement

भूमिपूजनप्रसंगी बोलताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनेश गावडे म्हणाले की, वेर्ले गावातील हे मंदिर धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. मंदिर परिसराचे सुशोभीकरण झाल्यामुळे त्याचे सौंदर्य अधिक खुलणार असून, भाविकांनाही चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून गावातील विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जात आहे. यामुळे गावाच्या विकासाला निश्चितच अधिक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी चंद्रकांत राणे, विकास सोसायटीचे चेअरमन विजय राऊळ, ग्रामपंचायत सदस्य बाळू गावडे, सूरज राऊळ, अनिल लिगवत, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सरपंच रुचिता राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुरू झालेल्या या कामामुळे ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या पाठपुराव्याला लोकप्रतिनिधींच्या निधीची साथ मिळाल्याने गावातील धार्मिक स्थळाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisement
Tags :

.