महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पुदुच्चेरी ते मुंबईपर्यंत सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी

06:58 AM May 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विशेष पथके लागली कामाला, तीन दिवसानंतरही हल्लेखोराचा थांगपत्ता नाही

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

धावत्या रेल्वेत चाकूहल्ला करून रेल्वे कर्मचाऱ्याचा बळी घेणाऱ्या माथेफिरूच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलीस पथकांनी हाती घेतले असून मुंबईपासून पुदुच्चेरीपर्यंतच्या रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज पडताळण्यात येत आहेत.

रेल्वे विभागाचे डीआयजी एस. डी. शरणप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत. या घटनेला शनिवारी तीन दिवस उलटले तरी माथेफिरूचा शोध लागला नाही. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच पोलीस पथकाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईपासून पुदुच्चेरीपर्यंतच्या रेल्वे मार्गावरील फुटेज पडताळण्याचे काम सुरू केले आहे.

शुक्रवारी संशयित हल्लेखोराचे रेखाचित्र जाहीर करण्यात आले होते. जखमी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून त्याचे रेखाचित्र बनविण्यात आले आहे. चालुक्य एक्स्प्रेस पुदुच्चेरीहून बुधवारी रात्री मुंबईसाठी रवाना झाली होती. हा माथेफिरू नेमका कोणत्या रेल्वेस्थानकावर डब्यात चढला आहे. याची माहिती मिळविण्यात येत आहे.

खासकरून हुबळी, लोंढा, खानापूर रेल्वे स्थानकावर फुटेज तपासण्याचे काम हाती घेण्यात आले असून एका रेल्वे स्थानकावर हल्लेखोराची छबी सीसीटीव्हीत कैद झाल्याचे आढळून आले आहे. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी केवळ ती पुसट प्रतिमा पुरेशी ठरणार नाही. त्यामुळे चालुक्य एक्स्प्रेस ज्या मार्गांवरून धावते त्या मार्गावरील प्रत्येक रेल्वे स्थानकावरील फुटेज तपासले तरच त्याचा सुगावा लागणार आहे. या निर्णयाप्रत अधिकारी पोहोचले आहेत.

रेल्वे पोलिसांबरोबरच खानापूर पोलीसही कामाला लागले आहेत. गुरुवारी सायंकाळी टीसी व रेल्वे कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने खानापूरजवळ धावत्या रेल्वेतून उडी टाकली आहे. या माहितीवरून खानापूर, गुंजी, लोंढा परिसरातही शोध घेण्यात येत आहे. शनिवारी रात्रीपर्यंत हल्लेखाराविषयी कोणतीच माहिती पोलिसांना मिळाली नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article