फोंडा पोटनिवडणुकीबाबत आज निवाडा
पणजी : फोंडा पोटनिवडणुकीला आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिकांवर आज बुधवारी दुपारी निकाल देण्यासाठी उच्च न्यायालयाने सुनावणी निश्चित केली आहे. या पोटनिवडणुकीचे मतदान उद्या गुऊवारी 9 एप्रिल रोजी होणार आहे. मतदान अवघ्या एक दिवसांवर ठेपले असताना ही पोटनिवडणूक घ्यावी की नाही? यावर उच्च न्यायालय आज निवाडा देणार आहे. या याचिकेची पहिली सुनावणी 24 मार्च रोजी झाली होती. त्यानंतर, 30 मार्च आणि 1 एप्रिल मिळून तीन सुनावणी झाल्या असल्या तरी मध्येच आलेल्या सुट्या आणि रविवारमुळे निकाल लांबला आहे. त्यात या महत्वाच्या निकालाबाबतच्या सर्व बाबी आणि तरतुदीचा तुलनात्मक अभ्यास आणि अन्य निकालांचे दाखले यांचे परीक्षण करण्यासाठी खंडपिठाने आणखी वेळ घेतल्याने हा उशीर झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे चक्क फोंडा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला उच्च न्यायालय दुपारी आपला जाहीर करणार आहे.