For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक खटल्याचा 4 फेब्रुवारीला निकाल

10:17 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक खटल्याचा 4 फेब्रुवारीला निकाल
Advertisement

बेळगाव : महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक खटला क्रमांक 794 ची सुनावणी शुक्रवारी द्वितीय जेएमएफसी न्यायालयात झाली. यावेळी संशयितांचे जबाब नोंदवून घेण्यात आल्याने 4 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी निकाल दिला जाणार आहे.खटला क्रमांक 794/15 मध्ये बेळगाव ग्रामीण पोलिसांनी एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करून घेत न्यायालयात दोषारोप दाखल केला होता. कुमार परशराम मासेकर, केदारी राघोजी पाटील, नंदू गोपाळ कुगजी, राहुल अर्जुन अष्टेकर, नामदेव विठ्ठल कदम, राजू जोतिबा नायकोजी, सुधीर परशराम धामणेकर, प्रकाश नारायण कुगजी आणि मनोज लक्ष्मण नायकोजी यांच्याविरोधात खटला सुरू आहे.

Advertisement

मात्र या खटल्यातील संशयित मनोज नायकोजी यांचे निधन झाल्याने वरील 9 जणांच्याविरोधात खटला सुरू आहे. आजच्या सुनावणीवेळी सर्वांचा जबाब नोंदविण्यात आला. सर्वांतर्फे अॅड. शामसुंदर पत्तार यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यामुळे या खटल्याचा निकाल 4 फेब्रुवारी रोजी दिला जाणार आहे. यापूर्वी खटला क्रमांक 125, 166, 167, 306 या खटल्यातील सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे. तर खटला क्रमांक 122 आणि 125 ची सुनावणी सुरू आहे. 4 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या खटला क्रमांक 794 मधील सर्वांची निर्दोष मुक्तता होण्याची शक्यता आहे. या खटल्याचे कामकाज अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचण्णावर पाहत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.