For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

स्पिरिट वाहतूक प्रकरणी आमदार सतीश सैल,अबकारी अधिकाऱ्यांत शाब्दिक चकमक

10:02 AM Nov 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
स्पिरिट वाहतूक प्रकरणी आमदार सतीश सैल अबकारी अधिकाऱ्यांत शाब्दिक चकमक

माजाळी तपासणी नाक्यावरील घटना : स्पिरीटचा टँकर रोखून धरल्याने वादावादी

Advertisement

कारवार : बिदरहून गोव्याकडे होत असलेल्या स्पिरिट वाहतूक प्रकरणी कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल आणि अबकारी खात्याचे अधिकारी यांच्या दरम्यान जोरदार शाब्दिक चकमक झाल्याची घटना गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवरील माजाळी तपासणी नाक्यावर घडली. काहींच्या मते ताब्यात घेण्यात आलेल्या टँकरमध्ये 30 लाख रुपये किंमतीचे तर अन्य काही जणांच्या मते 80 लाख रुपये किंमतीचे स्पिरीट आढळून आल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, चार तारखेला बिदरहून गोव्याकडे स्पिरीटची वाहतूक करणारा टँकर माजाळी तपासणी नाक्यावर अडविण्यात आला. या टँकरमधील स्पिरीटची वाहतूक गोव्याकडे मद्यनिर्मितीसाठी की अन्य कारणासाठी हे स्पष्ट न झाल्याने अबकारी अधिकाऱ्यांनी स्पिरीटचे नमुने परीक्षणासाठी बेंगळूरला पाठविले व टँकर तपासणी नाक्यावर रोखून ठेवला. इतकेच नव्हेतर टँकरचालक आणि क्लिनरला कोणत्याही प्रकारची कारवाई न करता ताब्यात घेतले.

घटनेची माहिती मिळताच आमदार सतीश सैल तपासणी नाक्यावर दाखल झाले आणि स्पिरीट वाहतूक करणाऱ्या कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल न करता व टँकर रीतसरपणे जप्त न करता टँकरचालक आणि क्लिनरला दोन-तीन दिवसाप्ंाासून बेकायदेशीरपणे कसे काय ताब्यात ठेवून घेतले, याचा जाब अबकारी अधिकाऱ्यांना विचारला. यावेळी खात्याचे अधिकारी सदाशिव के. आणि सैल यांच्या दरम्यान शाब्दिक चकमकी झडल्या. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना सैल यांनी सदाशिव यांच्याकडील मोबाईल ताब्यात घेण्याची सूचना केली. तथापी सदाशिव यांनी आपला मोबाईल देण्यास स्पष्टपणे नकार दिला. यावेळी सदाशिव यांनी खात्याच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. स्पिरीटच्या नमुन्याचा रिपोर्ट दोन दिवसात हाती मिळेल. त्यानंतरच टँकर जप्त करायचा की नाही, चालक आणि क्लिनरला सोडून द्यायचे की नाही? हे वरिष्ठांच्या सूचनेवरून ठरविण्यात येईल, असेही स्पष्ट केले. यावेळी सदाशिव व सैल यांच्या दरम्यान शाब्दिक खटके उडाले. यावेळी काँग्रेसचे नेते शंभु शेट्टी आणि सैल यांचे समर्थक उपस्थित होते. शेवटी पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.