Karad News | मलकापूर नगरपरिषदेत 'हाय व्होल्टेज' ड्रामा! बांधकाम सभापती आणि विरोधी नगरसेवक भिडले; नक्की काय घडलं?
बांधकाम आढावा बैठकीत नगरसेवकांमध्ये जोरदार वाद
कराड ( सुभाष देशमुखे) - नगरपरिषदेचे सभागृह हे जनतेच्यामलकापूर प्रश्नांवर चर्चा होण्याचे व्यासपीठ की राजकीय तणावाचा आखाडा, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सोमवारी झालेल्या बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत बांधकाम सभापती आणि बिरोधी नगरसेवक यांच्यात जोरदार शाब्दिक बाद, तणातणी झाल्याची चर्चा शहरभर रंगली असून काही काळ वातावरण चांगलेच तापल्याचे उपस्थितांकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे बैठकीत एकमेकांचा एकेरी उल्लेख, आवाज चढवणे आणि थेट एकमेकांना उद्देशून शाब्दिक वादाचा प्रकार घडल्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे भविष्यात सभागृहातील बाद आणखी विकोपाला गेल्यास आश्चर्य वाटू नये, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
बैठकीचा उद्देश चांगला...
नगरपरिषदेच्या हद्दीत आमदार निधीतून बीस कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरू आहेत. प्रशासकीय काळात मंजूर झालेली ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जात असल्याने स्थानिक नगरसेवक आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सोमबारी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि नगरसेवक यांची आढावा बोलवली.बैठकीत प्रत्येक प्रभागातील कामांचा आढावा सुरू असतानाच वातावरण तापल्याचे सांगितले जाते. त्यानंतर विरोधी नगरसेवक दादासाहेब शिंगण आणि बांधकाम सभापती हणमंतराव जाधव यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी उडाल्याची माहिती उपस्थित सदस्यांकडून देण्यात आली.दोन्ही बाजूंनी आवाज चढवून एकेरी भाषेत आरोप-प्रत्यारोप झाल्याचेही काही सदस्यांनी सांगितले. यावरच प्रकरण थांबले नसून संतापलेले शिंगण हे बेट सभापतींच्या आसनाकडे गेल्यानंतर वातावरण अधिकच तणावपूर्ण झाल्याची चर्चा बैठकीनंतर शहरात रंगली.
राजकीय संघर्ष ठळक
विकासकामांच्या आढाव्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीची चर्चा शहरभर राजकीय रंगात रंगू लागली आहे. नुकत्याच ५ मे रोजी झालेली सभा तब्बल सहा तास चालली. अवांतर विषयांनी सभा ताणली, आढावा बैठकीत सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. दिवसेंदिवस तापत चालल्याने जनतेच्या प्रश्नपिक्षा राजकीय संघर्षच अधिक ठळक होत असून पुढील सभा पोलीस बंदोबस्तात घ्यायला लागू नये म्हणजे मिळवले असे नागरिक बोलत आहेत.