व्हिनस विलियम्स पराभूत
06:08 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, ग्युयांगझोयू
Advertisement
येथे सुरु असलेल्या डब्ल्यूटीएटूरवरील ग्युयांगझोयू खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या व्हिनस विलियम्सला महिला दुहेरीच्या उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला.
महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पोलिना कुडेरनेमेटोव्हा आणि मारिया टीमोफिव्हा या जोडीने 46 वर्षीय व्हिनस विलियम्स आणि तिची इंडोनेशियन साथिदार टीजेन यांचा 6-4, 6-7 (6-8), 10-6 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. व्हिनसने तब्बल 8 वर्षांनंतर डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेत महिला दुहेरीची पहिल्यांदाच उपांत्यफेरी गाठली होती. ग्युयांगझोयू स्पर्धेतील एकेरीच्या सामन्यात लिली टॅगरने व्हिनसचा 6-2, 6-2 असा फडशा पाडला होता. आता व्हिनसचे या स्पर्धेतील एकूण आव्हान संपुष्टात आले आहे.
Advertisement
Advertisement
