For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेखीमोव्हाकडून व्हिनस पराभूत

06:22 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
रेखीमोव्हाकडून व्हिनस पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था, टोरँटो

Advertisement

येथे सुरू झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील नॅशनल बँक खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत उझ्बेकच्या 23 वर्षीय कॅमिला रेखीमोव्हाने अमेरिकेच्या 46 वर्षीय व्हिनस विलियम्सला पराभवाचा धक्का देत पुढील फेरीत स्थान मिळविले.

या स्पर्धेत पावसाचा अडथळा आल्याने काही सामने उशीराने सुरू झाले. पहिल्या फेरीतील सामन्यात रेखीमोव्हाने व्हिनस विलियम्सचा 6-4, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. डब्ल्यूटीए टूरवरील 1000 दर्जाच्या या महिलांच्या टेनिस स्पर्धेत व्हिनसला वॉईल्डकार्डद्वारे प्रमुख ड्रॉमध्ये स्पर्धा आयोजकांनी प्रवेश दिला होता. 2025 च्या जुलैनंतर 46 वर्षीय व्हिनसने आतापर्यंत सलग 12 सामने गमविले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.