महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टूलकिटच्या स्वरुपात काम करत आहेत वेणुगोपाल

06:07 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजप खासदार निशिकांत दुबेंचा आरोप : सरकारला बदनाम करण्याचा हेतू

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

संसदेच्या लोकलेखा समितीचे सदस्य निशिकांत दुबे यांनी समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वेणुगोपाल केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी आणि देशाच्या वित्तीय चौकट आणि अर्थव्यवस्थेला अस्थिर करण्यासाठी निरर्थक मुद्दे उपस्थित करत आहेत असे दुबे यांनी म्हटले आहे. भाजप खासदार दुबे यांनी  लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून वेणुगोपाल हे स्वत:च्या पदाचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचविण्यासाठी ‘टूलकिट’च्या हिस्स्याच्या स्वरुपात काम करत असल्याचे दुबे यांनी म्हटले आहे.

लोकलेखा समितीने सेबी अध्यक्ष माधवी बुच यांना चौकशीसाठी पाचारण करण्याचा निर्णय घेतला असताना दुबे यांनी हा आरोप केला आहे. बुच यांच्यावर अमेरिकन कंपनी हिंडनबर्ग रिसर्चकडून प्रोफेशनल अनियमिततेचे आरोप करण्यात आले आहेत.

हिंडनबर्गच्या आरोपांदरम्यान लोकलेखा समितीने देशाच्या सर्वोच्च नियामक प्राधिकरणांच्या कामकाजाची समीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. सेबी आणि ट्रायच्या प्रमुखांना 24 ऑक्टोबर रोजी बोलाविण्यात आले आहे. दुबे यांनी 9 सप्टेंबर रोजी वेणुगोपाल यांच्या कथित ‘असंवैधानिक आणि तिरस्कारपूर्ण’ वर्तनासंबंधी बिर्ला यांना पत्र लिहिले होते. तर लोकलेखा समितीने 4 ऑक्टोबर रोजी बुच यांना 24 ऑक्टोबर रोजी वक्तव्य नोंदविण्यासाठी बोलविण्याचा निर्णय घेतला. समितीत बहुमतात असलेल्या रालोआचे सदस्य नियामकाला अडचणीत आणण्याच्या वेणुगोपाल याहंच्या कुठल्याही पावलाला विरोध करणार असलयाचे संकेत दुबे यांच्या पत्रामुळे प्राप्त झाले आहेत.

निरर्थक मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न

निशिकांत दुबे यांनी वेणुगोपाल यांच्यावर असंवैधानिक आणि तिरस्कारपूर्ण वर्तनाचा आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांकडून काँग्रेसला विरोधी पक्षात बसविण्यात आल्याने समितीचे अध्यक्ष राजकीय हेतूने प्रेरित होत कार्य करत आहेत असा दावा दुबे यांनी केला आहे. तर काँग्रेस नेते वेणुगोपाल यांनी दुबे यांच्या या आरोपांवर अद्याप कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. वेणुगोपाल यांना काँग्रेसने निरर्थक मुद्दे उपस्थित करण्यासाठी निवडले आहे. यामागील उद्देश केवळ सरकारची बदनामी करणे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला अस्थिर करणे असल्याचा आरोप दुबे यांनी केला. जगातील विविध देश भारताच्या प्रगतीला पचवू शकत नाहीत. सेबीसारख्या महत्त्वपूर्ण संघटनांना भ्रष्ट ठरवून भारताची वित्तीय संरचना आणि अर्थव्यवस्थेला लक्ष्य करण्यासाठी हे टूलकिट तयार करण्यात आल्याचा दावा दुबे यांनी केला आहे.

टूल किटचा ‘इंडिया’ चॅप्टर

हिंडनबर्ग सारख्या विदेशी कंपनीकडून बुच यांच्या विरोधात करण्यात आलेले आरोप हे याच अभियानाचा हिस्सा आहेत. या टूल किटचा इंडिया चॅप्टर सक्रीय झाला आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी वेणुगोपाल यांनी लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदाचा वापर केला आहे. यावेळी देखील सेबी प्रमुखाच्या विरोधात हिंडनबर्ग रिसर्चसारख्या एका विदेशी संस्थेकडून कुठल्याही पुराव्याशिवाय आरोप करण्यात आले आहेत. हिंडनबर्ग रिसर्च ही देशातील व्यापारी घराणी, महत्त्वपूर्ण पदाधिकारी आणि वित्तीय संस्थांना लक्ष्य करण्यासाठी कुख्यात असल्याचा दावा दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article