वेंकटेश दग्गुबाती यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा
त्रिविक्रम श्रीनिवास करणार दिग्दर्शन
त्रिविक्रम श्रीनिवास यांच्या दिग्दर्शनातील चित्रपट ‘गुंटूर करम’ हा जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता दिग्दर्शनाने नव्या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. या आगामी चित्रपटात वेंकटेश दग्गुबाती मुख्य भूमिकेत असणार आहेत. निर्माते नागा वासमी यांनी एका पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे.
नागा वासमी यांनी ट्विट केला असून यात त्यांनी दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास आणि अभिनेता वेंकटेश यांचे एक छायाचित्र शेअर केले आहे. 20 महिन्यांच्या दीर्घ काळानंतर शब्दांचे जादूगार त्रिविक्रम हे कॅमेऱ्याच्या मागे परतले आहेत. सर्वांचे पसंतीचे विक्ट्री वेंकी मामा यांच्यासोबत ते काम करत आहेत. मनोरंजनाचे ओजी पुन्हा जादू घडवून आणण्यासाठी सेटवर परतले आहेत असे नागा वामसी यांनी नमूद केले आहे.
वेंकटेश हे यापूर्वी ‘संक्रातिकी वस्थूनम’ चित्रपटात दिसून आले होते. याची कहाणी आणि अन् दिग्दर्शनाची जबाबदारी अनिल रविपुडी यांनी पेलली होती. या चित्रपटात वेंकटेश यांच्यासोबत ऐश्वर्या राजेश, मीनाक्षी चौधरी, पी.साई कुमार, वीटीवी गणेश, सर्वदमन डी. बॅनर्जी, उपेंद्र लिमये आणि श्रीनिवास अवसारला देखील मुख्य भूमिकेत होते.