कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वेंगुर्लेच्या विधान धुरीला कांस्यपदक

03:31 PM Apr 22, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

पणजी येथे पार पडली राष्ट्रीय जलतरण स्पर्धा

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
ओपन वॉटर स्विमिंग अकादमीने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स, गोवा यांच्या सहकार्याने गोवा येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय गोवा जलतरण क्राउन 2025 सागरी जलतरण स्पर्धेत वेंगुर्ले येथील वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्लाच्या विभान विठ्ठल धुरी याने 14 वर्षाखालील गटात तृतीय क्रमांकासह कांस्यपदक पटकाविले आहे . ओपन वॉटर स्विमिंग अकादमी, इंडिया इन असोसिएशन विथ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्सच्या मान्यतेने ओपन वॉटर स्विमिंग अकादमीने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स, गोवा यांच्या सहकार्याने पणजी-गोवा येथील आयडब्ल्यूएस, डोनापॉला सर्कल, कारांझालेम बीच येथे दि. 19 व 20 एप्रिल रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय गोवा जलतरण क्राउन 2025 सागरी जलतरण स्पर्धेत 10 ते 14 वर्षे मुलांच्या गटात 1 कि.मी. जलतरण प्रकारात वेंगुर्ले भटवाडी येथील वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला चा विद्यार्थी विधान विठ्ठल धुरी याने 18:38 मिनिटात अंतर पार करीत तृतीय क्रमांकासह कास्यपदक पटकाविले. त्याला गोवा स्विमिंग असोसिएशनचे अध्यक्ष योगीराज कामत यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल प्रदान करून सन्मान करण्यात आला. यावेळी औसाच्या संचालिक पवित्रा पौईलकर, नॅशनल स्विमिंग ऑफ वॉटर स्पोर्ट्स मुख्य पवन गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.वेंगुर्ले भटवाडी येथील वेंगुर्ला हायस्कूल आठवीत शिक्षण घेणारा विधान विठ्ठल धुरी यास वेंगुर्ला हायस्कूलचे शिक्षक श्री. कर्लेकर तर जलतरण प्रशिक्षक दीपक विलास सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. तो वेंगुर्ले नगर परिषदेच्या जलतरण तलाव मध्ये जलतरण प्रशिक्षक दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सराव सातत्याने करत आहे. विधान धुरी याने मिळवलेल्या राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धेतील यशाबद्दल वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. डी. कांबळे, सर्व शिक्षक, पालक-शिक्षक संघ यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच या विद्यार्थ्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article