अनधिकृत वाळू रॅम्पवर वेंगुर्ले तहसीलदारांची कारवाई
परूळे/प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील कोरजाई खाडी नजीक असलेल्या अनधिकृत पाच वाळूच्या रॅम्पवर वेंगुर्ले तहसीलदारांनी धडक कारवाई करत वाळूचे रॅम्प उद्ध्वस्त केले ग्रामस्थांच्या मागणीला अखेर शासनाचे पाठबळ मिळाले वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केलेल्या कारवाईमुळे कोरजाई गावातील ग्रामस्थांकडून होत आहे समाधान व्यक्त वारंवार कारवाईची मागणी करूनही ग्रामस्थांना न्याय मिळत नसल्याने येथील स्थानिक ग्रामस्थ डॉक्टर नितीन सारंग यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र न्यायालयाच्या आदेशाला न्याय मिळत नसल्याने अखेर त्यांनी आमदार सुनील प्रभूंच्या माध्यमातून विधानसभेत या प्रश्नावर चर्चा घडवून आणली आणि अखेर शासनाला कारवाई करण्यास भाग पाडले आहे तर तहसीलदारांच्या या धडक कारवाईमुळे रॅम्प मालक व वाळुवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.गेली कित्येक वर्षे कर्ली खाडीतील कोरजाई भागात अवैध वाळू उत्खनन बोटीद्वारे मोठ्या प्रमाणात सुरू आहे.सध्या तर अवैध वाळू काढण्यात शासनाची बंदी असताना ऐन जुलै महिन्यांत या कोरजाई खाडीत आठ बोटी खाडीत खालून मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात होती.तर याठिकाणी रॅम्प मालकांनी पाच अनधिकृत वाळूचे रॅम्प केले होते.या अनधिकृत वाळूच्या रॅम्पवर वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी यांनी शुक्रवारी सायंकाळी निवती पोलिसांच्यावतीने अनधिकृत असलेल्या पाचही रॅम्पवर धडक कारवाई करून पाचही रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केल्याने कोरजाई गावात रॅम्प मालकासह वाळूवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.तसेच काही दिवसांपुर्वी पावसाळी अधिवेशनात या कोरजाई खाडीत अवैध वाळू काढली जात असल्याचे आमदार सुनील प्रभू यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते.यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोरजाई खाडीत सुरू असलेल्या अनधिकृत वाळू काढण्याऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश सभागृहात दिला होता.अखेर तहसीलदार ओंकार ओतारी यांनी धडक कारवाई केल्यामुळे कोरजाई गावातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.या कारवाईत निवती पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आशिष किनळेकर,पोलीस हवालदार पराग पोकळे,पोलीस पाटील जानवी खडपकर आदी महसूलचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.