For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उबाठाचे वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब यांचा राजीनामा

02:08 PM Jan 18, 2026 IST | अनुजा कुडतरकर
उबाठाचे वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब यांचा राजीनामा
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्याकडे दिला आहे. जि.प. व पं. स. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली असताना अचानकपणे यशवंत परब यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.उबाठा सेना पक्षाचे वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत परब यांनी जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांच्याकडे सादर केलेल्या राजीनामा पत्रात आपण गेली सहा वर्षे वेंगुर्ले तालुका प्रमुख म्हणून काम करत होतो. परंतु आपल्या वैयक्तिक कारणास्तव पक्षाच्या कामास वेळ देवू शकत नसल्याने राजीनामा देत आहे. सदरचा राजीनामा मंजूर करावा असे सुचित केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.