For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर आरवलीमार्गे वेंगुर्ले-शिरोडा वाहतूक सुरु

05:31 PM Jun 17, 2025 IST | अनुजा कुडतरकर
अखेर आरवलीमार्गे वेंगुर्ले शिरोडा वाहतूक सुरु
Advertisement

आरवली देवस्थान समोरील पूलाचे बांधकाम सार्वजनिक खात्याकडून पूर्ण

Advertisement

वेंगुर्ले (भरत सातोस्कर)-
आरवली वेतोबा देवस्थान समोरील पुलाच्या बांधकामाच्या कारणास्तव वेंगुर्ले आरवली मार्गे शिरोडा करावा लागणारा पर्यायी मार्गाचा प्रवास अखेर पुलाचे काम पुर्णत्वास आल्याने सोमवार दि. १६ पासून सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. तब्बल दोन महिने हे काम पुर्ण होण्यास लागले दरम्यान, तीन आठवडे या मार्गावरून सर्वच प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद केल्याने आरवलीच्या वेतोबाच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला. तसेच एस.टी. बस गाड्या या अन्य पर्यायी मार्गाने ये-जा करण्याचा रूट केल्याने प्रवाशी वर्गास मात्र भुर्दंड बसला. त्यामुळे नागरीकांतून होत असलेली नाराजी अखेर पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने दूर झाली. आरवली वेतोबा मंदिर समोरील पुलाचे बांधकाम दि. १५ एप्रिलपासून चालू करण्यात आले होते. या पूलाच्या बांधकामावेळी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी करण्यात आला होता. पण २० मे पासून जोरदार मान्सुनपुर्व पाऊस आला. त्यामुळे पर्यायी मार्गच वाहून गेला. त्यामुळे दि. २२ मे पासून सर्व प्रकारची ये-जा करणारी वाहातुक अन्य मार्गाने व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने टांक-आसोली-सोन्सुरे मार्गे शिरोडा अशी जाण्यासाठी तर शिरोडाहून येण्यासाठी शिरोडा-वेळागर-सागरतीर्थ मार्गे टांक हायस्कुल ते वेंगुर्ला अशी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत वेंगुर्ले तहसिलदार यांचेकडे लेखी पत्रव्यवहारातून करण्यात आली. त्यानुसार वेंगुर्ले तहसिलदार यांनी, सर्व प्रकारच्या वाहन धारकांना कळण्यासाठी नोटीस बोर्डवर तशा सुचना तर प्रवासी एस.टी. बस गाड्यांसाठी आगार व्यवस्थापकांना पत्रे देण्यात आली होती. मान्सुनपुर्व पावसात जोडून मान्सुन पाऊस सुरू झाला. त्यामुळे पुलाच्या ठिकाणी पर्यायी मार्गात पाणी आल्यामुळे, टांक मार्गे आसोली शिरोडा, अणसुर टांक-आसोली मार्गे शिरोडा व येणाऱ्या गाड्या शिरोडा-वेळागर-सागरतीर्थ मार्गे वेंगुर्ले अशी प्रवासी सेवा एस.टी. प्रशासनाकडून देण्यात येत होती. सदर पुलाचे काम जलद व्हावे व पुल लवकरात लवकर प्रवासासाठी खुला करावा यासाठी आरवलीचे माजी सरपंच मयूर आरोलकर व पोलीस पाटील मधुसुदन मेस्त्री यांनी सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा चालू ठेवला होता.अखेर या पुलाचे बांधकाम १५ जून रोजी पुर्ण झाल्याने तो सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस योग्य असल्याचे लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग वेंगुर्लेचे सहाय्यक उपअभियंता अश्लेष शिंदे यांनी लेखी पत्र वेंगुर्ले तहसिलदार यांना तसेच पोलीस निरीक्षक आणि वेंगुर्ले आगार व्यवस्थापक यांना देत या पुलावरून वहातुक सुरू करण्याचे स्पष्ट केले. त्यानुसार सदर वेतोबा मंदिरा समोरील पूल वाहतुकीस खुला करताना त्या नवीन पुलावर पुरोहित बाळा आपटे यांचेमार्फत पुजन स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी उपस्थितांत संजय आरोलकर, आरवलीचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते मयूर आरोलकर, पोलीस पाटील मधुसुदन मेस्त्री, श्रीपाद गुरव, सतीश येसजी, दिलीप पणशीकर, एकनाथ जोशी, कुणाल दळवी, सचिन येसजी, कृष्णा सावंत, बाळा आपटे, रंगनाथ सोन्सुरकर, सुशील भेरे, नंदा पेडणेकर, ठेकेदार विनय राणे, मयुरा राणे, प्रविण आरोलकर, कृष्णा येसजी, विष्णू सावंत, स्वप्नील येसजी, अक्षय येसजी, गौरव येसजी, सुहास गुरव आदींचा समावेश होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.