कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेंगुर्ले शाळा नं. ४ चे विद्यार्थी रमले बांधावरील शाळेत

05:32 PM Jul 26, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

वेंगुर्ले शाळा नं. ४ च्या शाळा व्यवस्थापन समितीने पहिली ते सातवीतील ८० विद्यार्थ्यांसाठी राऊळवाडा येथे 'बांधावरील शाळा' उपक्रम राबविला. स्थानिक शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी पारंपरिक पध्दतीने शेतीतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी तरवा काढणे, चिखल करणे, लावणी यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शेतीतील अवजारे, यंत्रसामग्री आणि ट्रॅक्टर याविषयी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. शालेय जीवनातच शेतीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित राऊळ यांच्या नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बेहरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित राऊळ, उपाध्यक्ष हर्षद परब, माजी अध्यक्ष व शिक्षणप्रेमी वासुदेव उर्फ बाळा परब, मेघना राऊळ, पदवीधर शिक्षक संतोष परब, उपशिक्षक सुधर्म गिरप, सानिका कदम, युवा प्रशिक्षणार्थी नेहा परब, अंगणवाडी सेविका नयना आरेकर, मदतनीस सत्यभामा गावडे, तसेच पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता-पालक संघ व शिक्षक-पालक संघ सदस्य उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article